अंजनी नरवणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंजनी जयंत नरवणे (जन्म : १७ मे इ.स. १९३४, सातारा) ह्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्रजीगुजराती पुस्तकांची मराठीत रूपांतरे केली आहेत.[१][२][३]

व्यक्तिगत जीवन[संपादन]

अंजनी नरवणे यांचे शालेय शिक्षण वाई शहरातील द्रविड हायस्कूल, साताऱ्यातील अ न्यू इंग्लिश स्कूल येथे तर कॉलेजचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॅालेजमध्ये झाले.. कॉलेज शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचे लग्न झाले. अंजनी नरवणे यांनी त्यानंतर पुढे १५ वर्षांनी घरच्या घरीच अभ्यास करून परीक्षा दिली व शिवाजी विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा रशियन भाषेचा डिप्लोमा केला. अंजनी नरवणे लग्नानंतर गुजराथेत गेल्या; तेथे त्या ४५ वर्षे राहिल्या व गुजराती भाषेत प्रावीण्य मिळवून गुजराती पुस्तकांची भाषांतरे करू लागल्या.

अंजनी नरवणे यांनी सन १९७४पासून दर्जेदार नियतकालिकांत लघुनिबंध, ललितलेख, लघुकथा, विनोदी लेख वगैरे लिहायला सुरुवात केली. सन १९८७पासून त्यांची स्वतंत्र आणि गुजराती-इंग्रजीतून अनुवादित केलेली पुस्तके प्रकाशित होऊ लागली.

अंजनी नरवणे यांचे पती डॉ. जयंत नरवणे हे आधी बडोद्याला ॲलेंबिक केमिकल कंपनीच्या औषध संशोधन खात्यात व्यवस्थापक व नंतर बंगलोरला नीरायू डिस्टिलरीजमध्ये मुख्य निदेशक होते. निवृत्तीनंतर ते होमिओपथीची प्रॅक्टिस करू लागले. अंजनी नरवणे यांना दोन मुली व एक मुलगा (नाव श्रवण) आहे. तीनही अपत्ये उच्चविद्याविभूषित असून भारतातच स्थिरावली आहेत.[१][permanent dead link]

अंजनी नरवणे यांची पुस्तके[संपादन]

 • अंकरहित शून्याची बेरीज (एकडा वगारना मिंडा या दिनकर जोषी यांच्या गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद)
 • अकूपार (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक - ध्रुव भट्ट)
 • अणसार (कादंबरी, मूळ गुजराती, लेखिका - वर्षा अडलजा)
 • अक्षयपात्र (अनुवाद; मूळ गुजराती, लेखिका - बिंदु भट्ट)
 • आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन (स्वतंत्र)
 • आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक - मायकेल हेस्टिंग्ज)
 • इट्‌स नॉट अबाउट द बाइक (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक - लान्स आर्मस्ट्रॉंग व जेनाकिन्स सॅली)
 • कथागुर्जरी (गुजराती कथांचा मराठी अनुवाद)
 • कुर्यात सदा गोंधळम् (स्वतंत्र)
 • चला ! उठा ! कामाला लागा ! (अनुवादित. मूळ गुजराती, लेखिका - स्वाती लोढा)
 • छावणी (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक - धीरेंद्र मेहता)
 • टर्निंग पॉइंट्‌स : आव्हाने पेलत केलेली वाटचाल ...(मूळ इंग्रजी. लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
 • टेक् २५ : वेध कलावंतांच्या अंतरंगाचे (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखिका - भावना सोमय्या)
 • तत्त्वमसि (दॅट दाऊ आर्ट’चा मराठी अनुवाद; मूळ गुजराती/इंग्रजी, लेखक - ध्रुव भट्ट)
 • डेज आॅफ गोल्ड ॲन्ड सीपिया (अनुवादित कांदंबरी, मूळ इंग्रजी, लेखिका - यास्मिन प्रेमजी)
 • नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (अनुवाद; मूळ इंग्रजी, लेखक - जेफ्री आर्चर)
 • नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य (मूळ इंग्रजी, लेखक - एन. चोक्कन)
 • प्लॅटफॉर्म नंबर ४ (अनुवादित; मूळ गुजराती, लेखिका - हिमांशी शेलत)
 • रामायणातील पात्रवंदना (अनुवादित; मूळ गुजराती, लेखक - दिनकर जोषी)
 • रुचिपालट (स्वतंत्र)
 • रूसी मोदी : द मॅन हू ऑल्सो मेड स्टील (मूळ इंग्रजी, लेखक - ज्योती सभरवाल व पार्थ मुखर्जी)
 • रेतीचा पक्षी (सहलेखिका - वर्षा अडाळजा)
 • वडवाई (स्वतंत्र)
 • सागरतीरी (’समुद्रांतिके’ या ध्रुव भट्ट यांनी लिहिलेल्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त गुजराती पुस्तकाचा मराठी अनुवाद)
 • हितगूज : तणावयुगातील तरुण पिढीशी (स्वतंत्र) (संदर्भ - हितगूज)

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "Amazon.com: Ansar (Marathi Edition) eBook: Varsha Adalja, Anjani Naravne: Kindle Store". www.amazon.com. 2018-03-26 रोजी पाहिले.
 2. ^ BHATT, DHRUV (2012-11-01). AKOOPAR. MEHTA PUBLISHING HOUSE. More than one of author-name-list parameters specified (सहाय्य)
 3. ^ "Anjani Naravne |अंजनी नरवणे". www.padmagandha.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-26 रोजी पाहिले.