Jump to content

दालन:महाराष्ट्र शासन

लघुपथ: दा:मशा, दा:महाशा
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सदस्य:अभय नातू/दालन महाराष्ट्र शासन या पानावरून पुनर्निर्देशित)


महाराष्ट्र शासन

महाराष्ट्र शासन किंवा महाराष्ट्र राज्य शासन ही भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सरकारी यंत्रणा आहे. या यंत्रणेचे निर्वाचित आणि नियुक्त असे दोन मुख्य भाग आहेत. राज्य संविधानानुसार लोकशाही मार्गाने निवडणूकांत जिंकलेले उमेदवार राज्याच्या मंत्रीमंडळाचा भाग असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसेच इतर मार्गांनी नियुक्त झालेले अधिकारी व सेवकवर्ग हा शासनाचा दुसरा भाग आहेत.

विशेष लेख

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ

स्पेन
स्पेन

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून, राज्यभरात गोदामांचे जाळे निर्माणकरुन औद्योगीक व कृषी क्षेत्रास साठवणुकीची सुविधा पुरविण्यासाठी या महामंडळाची निर्मीती केलेली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ ८ ऑगस्ट १९५७ ला “ॲग्रिकल्चर प्रोडयूस (डेव्हलपमेंट ॲण्ड वेअरहाउसिंग) कॉर्पोरेशन ॲक्ट १९५६” अन्वये स्थापन झाले.सन १९६२ मध्ये “द वेअरहाउऊसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२” पारित झाल्यानंतर, १९५६ चा कायदा रद्द झाला असून आता हे महामंडळ १९६२ च्या कायद्यान्वये कार्यरत आहे.

संरचना

  • महामंडळाचे भाग भांडवल - महाराष्ट्र शासन ५०% + केंद्रीय वखार महामंडळ ५०%
  • एकूण मंजूर भाग भांडवल - रु.१५.०० कोटी
  • प्राप्त भाग भांडवल - रु.८.७१ कोटी

वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन ॲक्ट १९६२ च्या तरतुदीप्रमाणे महामंडळ संचालक मंडळाच्या अखत्यारीत काम करते.
या संचालक मंडळात केंद्रीय वखार महामंडळ व महाराष्ट्र शासन यांनी नामनिर्देशित केलेले प्रत्येकी पाच संचालक असतात.

पुढे वाचा...

विधानसभा पक्षनिहाय रचना

विधानसभा पक्षनिहाय रचना
विधानसभा पक्षनिहाय रचना
  1. भाजप - १०५
  2. शिवसेना - ५६
  3. राष्ट्रवादी काँग्रेस - ५४
  4. काँग्रेस - ४४
  5. इतर - १६
  6. स्वतंत्र - १३

हे आपणास माहीत आहे काय?

  • ...महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कार्यालय मंत्रालयाच्या सहाव्या तर मुख्य सचिवांचे कार्यालय पाचव्या मजल्यावर आहे?


परिचय

उद्धव ठाकरे

‌‌
उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (जन्म : २७ जुलै १९६०) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत. इ.स. २००३ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्या कडे देण्यात आली. ठाकरे यांनी २८ नोव्हेंबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे १९वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.१४ मे २०२० उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड.

आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आणले.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली व ५६ आमदार निवडून आणले! पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली व उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडी चे सरकार स्थापन केले व राज्याच्या १९ व्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली.

पुढे वाचा... उद्धव ठाकरे

 * येथे राज्य शासनातील एका अधिकारी किंवा मंत्री यांचा अल्प परिचय देण्यात येतो. 

महाराष्ट्र शासन विभाग

माहिती तंत्रज्ञान
सामान्य प्रशासन
गृहविभाग
महसूल विभाग
वन विभाग
कृषी विभाग
पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय
शालेय शिक्षण आणि क्रिडा
नगर विकास विभाग
सार्वजनिक बांधकाम
वित्त विभाग
उद्योग विभाग
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग
जलसंपदा विभाग
विधी व न्याय विभाग
ग्रामविकास व पंचायत राज विभाग
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
नियोजन विभाग
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
जलसंधारण व रोजगार हमी योजना
गृहनिर्माण विभाग
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग
सार्वजनिक आरोग्य विभाग
आदिवासी विकास विभाग
पर्यावरण विभाग
सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग
वस्त्रोद्योग विभाग
उच्च व तंत्रशिक्षण विभाग
उर्जा विभाग
मराठी भाषा विभाग
पर्यटन व सांस्कृतिक कार्य
अल्पसंख्यांक विकास विभाग
कौशल्य विकास व उदयोजकता
परिवहन विभाग
महिला व बालविकास विभाग
संसदीय कार्य विभाग
कामगार विभाग
     



उपविभाग: विभागानुसार यादी

मंत्रीमंडळ: कॅबिनेट मंत्री | राज्यमंत्री | भूतपूर्व मंत्री

सचिवालय: सचिव | उपसचिव | भूतपूर्व मुख्य सचिव


मंत्रालयाचे उपविभाग



महामंडळे
सचिवालय
हवे असलेले सचिव
सुचवा
मंत्रीमंडळ
हवे असलेले मंत्रीमंडळ
सुचवा

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान भवन)

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय (विधान भवन) हे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाचे मुख्यालय असून महाराष्ट्र विधिमंडळाच्या विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांची अधिवेशने भरण्याचे नियमित स्थळ आहे. विधिमंडळाच्या मूळ संकल्पनेनुसार महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात अधिवेशनांच्या माध्यमामधून महाराष्ट्र राज्याशी संबंधित अनेकविध विषयांवर कायदे केले जातात. याच विधिमंडळाच्या इमारतीत असणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधान परिषद या दोन लोकतांत्रिक सभागृहांमध्ये राज्याच्या वार्षिक अर्थसंकल्पााला आकार दिला जातो तसेच जनतेशी निगडित विविध समस्यांवर सांगोपांग चर्चा होऊन त्यांचे निराकरण देखील करण्यात येते. विधिमंडळ अनेक महत्त्वाच्या विषयांवर अधिक अभ्यासपूर्ण चर्चा घडाव्यात या हेतूने त्या विषयांशी संबंधित समित्यांची स्थापना देखील करते. जनतेने आपल्यातून निर्वाचित करून शासनात आपले प्रतिनिधित्त्व करण्यासाठी पाठवलेले लोकप्रतिनिधी सामुदायिकरीत्या आपले जनतेप्रति कर्तव्य बजावण्याचे काम येथून करीत असल्यामुळे विधिमंडळाला यथार्थापणे 'लोकशाहीचे मंदिर' असे संबोधले जाते. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी महाराष्ट्राच्या उपराजधानीचा मान नागपूर या वैदर्भीय शहरास प्राप्त आहे. त्यामुळे सन १९५३ रोजी झालेल्या नागपूर करारा़न्वये [१] महाराष्ट्र विधिमंडळाच्या उन्हाळी, पावसाळी व हिवाळी या तीन अधिवेशनांपैकी हिवाळी अधिवेशन हे नागपूर या शहरातील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या इमारतीत आयोजित केले जाते. महाराष्ट्र विधिमंडळाबद्दल अधिक तपशीलवार माहिती घेण्यासाठी आपण इंटरनेटवरील या संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

तुम्ही काय करू शकता

  • हे दालन महाराष्ट्र शासन, त्याचे अनेक विभाग आणि त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या सरकारी तसेच निमसरकारी संस्थांबद्दलची माहिती पुरवते. यातील लेखांच्या विस्तारीकरणाचे व अन्य संबंधित कामांचे सहयोगी पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी विकिपीडिया:विकिप्रकल्प महाराष्ट्र शासन हा विकिप्रकल्प चालवला जात आहे. या विकिप्रकल्पात सहभागी होऊन आपण अन्य उत्सुक सदस्यांच्या साथीने नवीन लेख तयार करू शकता, तसेच विस्ताराच्या प्रतीक्षेत असलेल्या लेखांमध्ये भर घालू शकता.
  • नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे आणि अधिक माहिती आणि मदतीकरिता विकिपीडिया:चावडी येथे भेट द्यावी.
लेख
विस्तारण्याजोगे लेख
महाराष्ट्र शासकीय अधिकारी - महाराष्ट्र राज्य शासनातील उच्च श्रेणी पदांची यादी
नवीन लेख
सुचवा.
साचे
हवे असलेले नवीन साचे
सुचवा

मार्गदर्शनपर चित्रफितींसाठी येथे क्लीक करा