Jump to content

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (इंग्लिश: Maharashtra Knowledge Corporation Limited, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड) ही महाराष्ट्रात माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण व प्रसार करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने स्थापण्यात आलेली सार्वजनिक क्षेत्रीय मर्यादित कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून इ.स. २०११ च्या सुमारास हिची विविध ठिकाणी ५,०००हून अधिक केंद्रे आहेत. विवेक सावंत हे या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत [१].

उद्दिष्टे[संपादन]

 1. विकासाच्या दृष्टीने आजीवन शिक्षणाचा पुरस्कार करणे
 2. जागतिक दर्जाच्या ज्ञान संसाधनांच्या निर्मितीस उत्तेजन देणे
 3. माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना जागतिक स्तरावर पोहोचविणे
 4. डिजिटल साक्षरतेतील तफावत व त्यातून निर्माण होणारी ज्ञानातील तफावत दूर करणे

ध्येय[संपादन]

सुयोग्य अशा भागीदारी संबंधांच्या माध्यमातून आजीवन शिक्षण, प्रशासन तसेच सबलीकरण यांसंबंधीच्या -

 • निरनिराळ्या प्रकारचे वैविध्य असणाऱ्या प्रचंड मोठ्या समुदायाकरिता : अधिक मोठ्या प्रमाणात
 • जीवनात आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुसंगत तसेच उपयुक्त अशा : अधिक चांगल्या
 • वाजवी मोबदल्यात मिळणाऱ्या : स्वल्प दरात
 • शक्य तितक्या कमीत कमी वेळात मिळणाऱ्या : अधिक जलद
 • शहरांपासून ते लहान गावांमध्ये सर्वत्र उपलब्ध होणाऱ्या : अधिक व्यापक
 • जनसमुदायाकरिता असूनही वैयक्तिक पातळीवर वापरता येतील अशा : समृद्ध आणि व्यक्ती-अनुरूप अनुभव देणाऱ्या

सेवा देणे हे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे ध्येय आहे.

अभ्यासक्रम[संपादन]

या संस्थेमार्फत महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेशन इन इन्फर्मेशन टेक्नॉलजी (एमएस सीआयटी, रोमन लिपीतील लघुरूप: MS CIT) नावाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवण्यात येतो [२].

संदर्भ[संपादन]

 1. ^ "विवेक सावंत यांची प्रोफाइल" (PDF) (इंग्लिश भाषेत). Archived from the original (PDF) on 2012-09-05. २२ जानेवारी, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
 2. ^ "एमएस सीआयटी प्रमाणपत्र अभ्यासक्रम" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे[संपादन]