महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ या पानावरून पुनर्निर्देशित)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
ब्रीदवाक्य प्रवाश्यांच्या सेवेसाठी
प्रकार प्रवासी
स्थापना १९४८
संस्थापक मुंबई प्रांत सरकार
मुख्यालय

मुंबई, भारत

महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंन्ट्रल, मुंबई – ४०० ००८.
कार्यालयांची संख्या
सेवांतर्गत प्रदेश महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश
महत्त्वाच्या व्यक्ती श्री. दिवाकर रावते चेअरमन, श्री.दिपक कपूर,उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
सेवा प्रवाशी वहातूक
एकूण उत्पन्न
(कर/व्याज वजावटीपूर्वी)
४३७० कोटी
निव्वळ उत्पन्न ७० कोटी
मालक महाराष्ट्र शासन
विभाग १२
संकेतस्थळ http://msrtc.gov.in/msrtc_live/index.html

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (प्रचलित नाव: एस.टी.) ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरुपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत. परिवहन आयुक्त - IAS श्याम वर्धने

स्थापना आणि इतिहास[संपादन]

वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतूकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारा खासगी व्यावसायिकांद्वारे सुरु झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. १९४७ मध्ये भारतातील ब्रिटीशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.

बीएसआरटीसीची पहिली बस जून १, इ.स. १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला.

सेवा आणि विस्तार[संपादन]

वाहनांचा ताफा (फ्लीट)[संपादन]

एस. टी.ची साधी बस
एस.टी.ची वातानुकूलीत शिवनेरी बस
एस.टी.ची निम-आराम हिरकणी बस

आज एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सुमारे १५ हजार ५५० वाहने आहेत त्यांचा तपशील असा

साध्या बसगाड्या १४०२२
शहर बस गाड्या ६५१
निम आराम बसगाड्या ५४४
मिनी बसगाड्या १९९
डीलक्स बसगाड्या ४८
वातानुकुलित बसगाड्या २६
मिडी गाड्या १०

याशिवाय अधिकारीवर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामंडळाकडे आहेत

बसस्थानके[संपादन]

मुंबई विभाग[संपादन]

 1. मुंबई
 2. परळ
 3. कुर्ला नेहरू नगर
 4. पनवेल
 5. उरण

पालघर विभाग[संपादन]

 1. पालघर
 2. बोईसर
 3. सफाळे
 4. डहाणू
 5. जव्हार
 6. अर्नाळा
 7. वसई

ठाणे विभाग[संपादन]

 1. ठाणेकरमाळा
 2. ठाणे-2
 3. भिवंडी
 4. कल्याण
 5. Michael

रत्नागिरी विभाग[संपादन]

 1. रत्नागिरी
 2. लांजा
 3. राजापूर
 4. संगमेश्वर
 5. गुहागर
 6. चिपळूण
 7. खेड
 8. दापोली
 9. मंडणगड

आधुनिकीकरण[संपादन]

महामंडळाची रचना[संपादन]

 • श्री.जिवनराव गोरे चेअरमन
 • श्री. sanjay khandare उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
 • श्री. आर. आर. माणगावकर (स्पेशल आय.जी.) मुख्य सुरक्षा अधिकारी
 • श्री. आर. एस. धोंगडे. आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी
 • श्री.के.एम.माने महाव्यवस्थापक (एस आणि पी)
 • कॅप्टन व्ही. व्ही. रत्नपारखी महाव्यवस्थापक (वाहतुक)
 • श्री.कॅ.आर.बी.सानेर (पाटील) महाव्यवस्थापक (पी आणि आयआर)
 • श्री. आर. आर. पाटील महाव्यवस्थापक (प्लॅन)
 • श्री.व्ही.बी.गायधनी महाव्यवस्थापक (एमई)
 • श्री.जे.बी.इनामदार मुख्य स्थापत्य/सिव्हील अभियंता
 • श्री.ए.व्ही.पाटील मुख्य विधी अधिकारी
 • श्री.एस.डी.लुबल उप महाव्यवस्थापक (ईडीपी)
 • श्री.संजय सुपेकर सचिव,म.रा.मा.प.महा.

संलग्न संस्था[संपादन]

कर्मचारी संघटना आणि व्यवस्थापन[संपादन]

सामाजिक जबाबदारी[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]