महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
Appearance
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ भारताच्या महाराष्ट्र राज्यात प्रदूषण नियंत्रणाचे काम करते.
हे मंडळ पुढील कामे करते --
- प्रदूषण प्रतिबंध, नियंत्रण किंवा बंदी आणि त्याची सुरक्षितता यासाठी व्यापक कार्यक्रमांची योजना करणे.
- प्रदूषण विषयक माहिती गोळा करणे व तिचा प्रचार करणे व त्याचा प्रतिबंध, नियंत्रण व बंद करणे.
- सांडपाणी किंवा व्यापारी सांडपाणी व टाकावू पदार्थांच्या निपटाऱ्याच्या सुविधांचे तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धतीचे निरीक्षण करणे व उपचार संयंत्र, निपटाऱ्याच्या पद्धती तसेच हवा प्रदूषण नियंत्रण पद्धती या विषयीच्या योजना, विनिर्देश किंवा इतर माहितीचा आढावा घेणे.
- प्रदूषण नियंत्रण, टाकावू पदार्थांवर पुनर्प्रक्रिया करून पुन्हा उपयोगात आणणे, पर्यावरणस अनुकूल पद्धती ईत्यादी क्षेत्रात होणाऱ्या विकासाला सहाय्य करणे व प्रोत्साहन देणे.
- योग्य प्रदूषण नियंत्रण तंत्रज्ञान व पद्धती द्वारे पर्यावरण वृद्धीसाठी उद्योजकांना शिक्षित करणे व मार्गदर्शन देणे.
- स्वच्छ व स्वस्थ पर्यावरणा विषयी सार्वजनिक जागरुकता निर्माण करणे तसेच प्रदूषणा संबंधी सार्वजनिक तक्रारींची दखल घेणे.
पत्ता:कल्पतरू पॉईंट, ३ रा व ४ था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, सायन सर्कल, मुंबई- ४०००२२