"चैत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ ६७: | ओळ ६७: | ||
* चैत्र पौर्णिमा |
* चैत्र पौर्णिमा |
||
** [[हनुमान जयंती]] |
** [[हनुमान जयंती]] |
||
==चैत्र महिन्यातली विशिष्ट व्रते== |
|||
अजादान : |
|||
अजा= शेळी. चैत्र मासी कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस नक्त भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. भोजनापूर्वी चंदनाने पार्वतीची दशभुज प्रतिमा रेखतात. ज्वालामुखी या नावाने तिची पूजा करतात. तिसर्या दिवशी पाच दुधाळ शेळ्या ब्राह्मणास दान देतात. दानाचे फल-मोक्ष. |
|||
आनंदव्रत : |
|||
या व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते. व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पान्ती राजपद. |
|||
तिथीपूजन : |
|||
प्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथिस्वामीची पूजा करुन हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे- प्रातःस्नान उरकुन वेदीवर अथवा चौरंगावर लाल वस्त्र पसरुन त्यावर अक्षतांचे अष्टदल काढावे. ज्या दिवशी जी तिथी असेल त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्य मध्यभागी स्थापन स्थापन करुन तिची पूजा करावी. निरनिराळ्या तिथींचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत. |
|||
प्रतिपदा-अग्निदेव; द्वितीया-ब्रह्मा; तृतीया-गौरी; चतुर्थी-गणेश; पंचमी-सर्प; षष्ठी-स्वामी कार्तिक; सप्तमी-सूर्य; अष्टमी-शिव (भैरव); नवमी-दुर्गा; दशमी-अन्तक (यमराज); एकादशी-विश्वेदेवा; द्वादशी-हरी (विष्णु); त्रयोदशी-कामदेव; चतुर्दशी-शिव; पूर्णिमा-चंद्र; अमावस्या-पितर. या तिथीस्वामींचे पूजन त्या त्या तिथीला करावे म्हणजे हर्ष, उत्साह आणि आरोग्य यांची अभिवृद्धी होते. |
|||
२२:४५, २५ मार्च २०१७ ची आवृत्ती
चैत्र हा हिदू पंचांगाप्रमाणे, तसेच भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना आहे. हिंदू पंचागानुसार हा महिना चैत्र प्रतिपदेला सुरू होतो, तर भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे २२ किंवा (इसवी सनाच्या लीप वर्षाला) २१ मार्चला त्या महिन्याची पहिली तारीख असते.
सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्या वेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र महिना सुरू होताना वसंत ऋतूची सुरुवात होते. (ऋतूंचे नेमके महिने कोणते त्यावर विविध मते आहेत. काहींच्या मते वसंत ऋतू फाल्गुन महिन्यात सुरू होतो.)
चैत्र महिन्यातील सण, यात्रा, जयंत्या, पुण्यतिथ्या
- चैत्र शुद्ध प्रतिपदा
- गुढीपाडवा
- चेटी चांद (चैत्री चंद्र)
- चैत्र नवरात्रारंभ
- कृष्णाजी महाराज यात्रा, सावंगा (अमरावती)
- गौतम ऋषी जयंती
- भगवान झुलेलाल जयंती
- दादा ठणठणपाळ आनंद महोत्सव
- निंबादेवीची यात्रा, निंबोळा (बुलढाणा)
- बाबाजी महाराज पुण्यतिथी, लोधीखेडा (छिंदवाडा)
- महालक्ष्मी पालखी यात्रा (मुंबई)
- माधवनाथ महाराज जन्मोत्सव, चित्रकूट-इंदूर
- छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी
- सीतारामबाबा उंडेगावकर जन्मोत्सव, उंडेगाव-परांडा (उस्मानाबाद)
- डाॅ. हेडगेवार जयंती
- चैत्र शुद्ध द्वितीया
- अक्कलकोट महाराज प्रकट दिन
- सिंधारा दोज
- हरिहर महाराज (त्याडी) पुण्यतिथी, अमरावती
- चैत्र शुद्ध तृतीया-गौरी तृतीया; मत्स्य जयंती; सौभाग्यसुंदरी व्रत;
- चैत्र शुद्ध चतुर्थी :
- गुरु अनंगदेव पुण्यतिथी
- गॊमाजी महाराज यात्रा, नागझरी-बुलढाणा जिल्हा
- चैत्र शुद्ध पंचमी
- गुहराज निषाद जयंती
- गुरु गॊविंदसिंग पुण्यतिथी
- जगदंबा यात्रा, आष्टा (नांदेड)
- जगदंबा यात्रा, गोडेगाव (श्रीरामपूर)
- पहाडसिंग महाराज पुण्यतिथी, खामगाव (बुलढाणा)
- पहाडसिंग महाराज पुण्यतिथी, पारखेड (बुलढाणा)
- पुंडलिकबाबा जयंती, मूर्तिजापूर (अकोला)
- मीना अवतार (मीना समाज)
- राम राज्यॊत्सव
- श्री पंचमी
- श्री लक्ष्मी पंचमी
- सटरफटर महाराज पुण्यतिथी, धालेवाडी, पुरंदर (पुणे)
- चैत्र शुद्ध अष्टमी
- सम्राट अशॊक जयंती
- अशोककलिका प्राशनविधी
- अशॊकाष्टमी
- दुर्गाष्टमी व्रत
- महाष्टमी
- साईबाबा महोत्सव प्रारंभ (शिर्डी)
- चैत्र शुद्ध नवमी
- अवधिया दिवस
- खंडेलवाल दिवस (काही लोक हा दिवस वसंत पंचमी]]ला आहे असे मानतात.)
- राम नवमी
- संत सुंदरदास जयंती (काही लोक हा दिवस वसंत पंचमी]]ला आहे असे मानतात.)
- चैत्र शुद्ध एकादशी
- कामदा एकादशी
- चैत्री यात्रा (पंढरपूर)
- भाऊ महाराज साल्पेकर पुण्यतिथी (नागपूर)
- शंभूमहादेव यात्रा (शिखर शिंगणापूर)
- साधू महाराज पुण्यतिथी, उमरखेड (पुसद)
- चैत्र शुद्ध त्रयोदशी
- आसरादेवी यात्रा, दोनद खुर्द (अकोला)
- महावीर जयंती
- चैत्र शुद्ध चतुर्दशी
- दानक चतुर्दशी
- चैत्र पौर्णिमा
चैत्र महिन्यातली विशिष्ट व्रते
अजादान : अजा= शेळी. चैत्र मासी कोणत्याही शुभ दिवसापासून तीन दिवस नक्त भोजन करतात. दुधाने भिजवलेल्या तांदळाच्या पिठाची भाकरी हे भोज्य अन्न समजतात. भोजनापूर्वी चंदनाने पार्वतीची दशभुज प्रतिमा रेखतात. ज्वालामुखी या नावाने तिची पूजा करतात. तिसर्या दिवशी पाच दुधाळ शेळ्या ब्राह्मणास दान देतात. दानाचे फल-मोक्ष. आनंदव्रत : या व्रतात अयाचित जलदान करावयाचे असते. व्रतावधी चैत्रादी चार महिने. व्रताच्या अंती अन्न, वस्त्र, तिलपात्र व सुवर्ण यांचे दान करावयाचे असते. फल-ब्रह्मलोकाची प्राप्ती व कल्पान्ती राजपद. तिथीपूजन : प्रतिपदादी प्रत्येक तिथीला तिथिस्वामीची पूजा करुन हे व्रत केले जाते. त्याचे विधिविधान असे- प्रातःस्नान उरकुन वेदीवर अथवा चौरंगावर लाल वस्त्र पसरुन त्यावर अक्षतांचे अष्टदल काढावे. ज्या दिवशी जी तिथी असेल त्या दिवशी त्या तिथीच्या स्वामीची सुवर्णमूर्ती अष्टदलाच्य मध्यभागी स्थापन स्थापन करुन तिची पूजा करावी. निरनिराळ्या तिथींचे स्वामी पुढीलप्रमाणे आहेत. प्रतिपदा-अग्निदेव; द्वितीया-ब्रह्मा; तृतीया-गौरी; चतुर्थी-गणेश; पंचमी-सर्प; षष्ठी-स्वामी कार्तिक; सप्तमी-सूर्य; अष्टमी-शिव (भैरव); नवमी-दुर्गा; दशमी-अन्तक (यमराज); एकादशी-विश्वेदेवा; द्वादशी-हरी (विष्णु); त्रयोदशी-कामदेव; चतुर्दशी-शिव; पूर्णिमा-चंद्र; अमावस्या-पितर. या तिथीस्वामींचे पूजन त्या त्या तिथीला करावे म्हणजे हर्ष, उत्साह आणि आरोग्य यांची अभिवृद्धी होते.
हिंदू पंचांगानुसार बारा महिने | |
← चैत्र महिना → | |
शुद्ध पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा |
कृष्ण पक्ष | प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या |
भारतीय महिने |
---|
चैत्र · वैशाख · ज्येष्ठ · आषाढ · श्रावण · भाद्रपद · आश्विन · कार्तिक · मार्गशीर्ष · पौष · माघ · फाल्गुन |
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |