चैत्र शुद्ध तृतीया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चैत्र शुद्ध तृतीया ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील तिसरी तिथी आहे.


चैत्र शुद्ध तृतीया ही हिंदू पंचांगाप्रमाणे चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षात तिसर्‍या दिवशी येणारी तिथी आहे. महाराष्ट्रातील या दिवशी देवघरात ठेवलेल्या छोट्या पाळण्यामध्ये चैत्रगौरी बसते आणि ती पुढे वैशाख शुद्ध तृतीयेला-अक्षय्य तृतीयेला- उठते.

चैत्र शुद्ध तृतीयेला गौरी तृतीया म्हणतात. याच दिवशी मत्स्यजयंती असते. या दिवशी गौरी माहेरी येते आणि एक महिना राहते. या कालखंडात स्त्रिया आसपासच्या स्त्रियांना घरी हळदीकुंकवाला बोलावतात.