Jump to content

कुपोषण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुपोषण
वर्गीकरण व बाह्यदुवे
आय.सी.डी.-१०

GroupMajor.minor

ICD9 = 263.9
मेडलाइनप्ल्स 000404
इ-मेडिसिन ped/1360
मेडिकल सब्जेक्ट हेडिंग्ज D044342
कुपोषित
कुपोषित

शरीराचे वाढीसाठी आवश्यक योग्य पोषणमुल्ये असलेला आहार/अन्न न मिळाल्यामुळे वा भूकमारीने होणारी प्राण्यांच्या (विशेष‌तः अल्पवयीनांच्या) शरीराची स्थिती.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्त्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.पुरेसा व योग्य आहार न घेतल्यामुळे जी अशक्तपणाची व आजारपणाची परिस्थिती निर्माण होते तीला कुपोषण म्हणतात. व त्या व्यक्तीला कुपोषित म्हणता येईल.

कुपोषण म्हणजे आजार नव्हे परंतु अयोग्य आहार, उपासमार व जीवनसत्त्वांचा अभाव यांचा परिणाम मुलांच्या शरीरावर होतो. असे मुल लहानश्या आजाराने सुद्धा अशक्त दिसु लागते. उदा. अंगावर सुज येणे, मुल रडके होणे. बाळाची वाढ खुंटणे, वजन व उंची वयाच्या प्रमाणात ण वाढणे यालाच कुपोषण म्हणतात.दैनंदिन आहारातील काही पोषक घटकांच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजाराला कुपोषण म्हणतात . हा संसर्गजन्य आजार नाही. बालकांच्या आहारातील कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्त्वे , खनिजे यांच्या कमतरतेमुळे होणारा आजार आहे. आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे झालेल्या किंवा होणाऱ्या आजारांचे (कुपोषणाचे) विविध प्रकार आहेत .जागतिक आरोग्य संस्थेने केलेल्या व्याख्येनुसार कुपोषण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या पोषण आहारातील कमतरता, अतिरेक किंवा असंतुलन.कुपोषणामुळे बालकांच्या आजारपणात वाढ होते आणि बऱ्याच वेळा बालमृत्यूचे प्रमाण देखील वाढते.

कुपोषणाचे तीन गट

[संपादन]

उंचीच्या मानाने वजन कमी असणे

[संपादन]

अत्यंत कमी कालावधीत बालकाचे वजन वेगाने कमी होत जाते. ही लक्षणे मुख्यत: पुरेसा आहार मिळत नसल्यास, संसर्गजन्य आजार झाला असल्यास, खूप प्रमाणात उलट्या जुलाब झालेल्या मुलांमध्ये दिसून येतात. वेलिक उपचार न केल्यास बालमृत्यू होऊ शकतो.  योग्य वेळी योग्य उपचार केल्यास बाळाला यातून वाचवता येते.

वयाच्या मानाने कमी उंची असणे

[संपादन]

हा कुपोषणाचा प्रकार मुख्यत्वे सातत्याने अपुरा व सकस आहार न मिळाल्याने, गरीब घरातील बालकांमध्ये, आईला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे, आई सातत्याने आजारी असल्यामुळे, बाल सातत्याने काही न काही कारणाने आजारी पडत असल्यामुळे आणि बालकाच्या जन्मापासूनच त्याला योग्य व पुरेसा आहार न मिळाल्यामुळे होतो. अशा बालकांची शारीरिक व मानसिक वाढ पूर्ण होत नाही.

सूक्ष्म घटकांशी संबंधित कुपोषण

[संपादन]

आहारातील जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होणारे कुपोषण. जीवनसत्त्वे व खनिजे बालकाच्या शारीरिक विकासासाठी आवश्यक असलेल्या enzymes , hormonesची निर्मिती करण्यासाठी मदत करतात. आयोडिन, अ जीवनसत्त्व व लोह हे मानवाच्या आरोग्यासाठीचे महत्त्वाचे घटक आहेत.  या सूक्ष्म घटकांच्या कमतरतेमुळे विकसनशील देशातील लहान मुले व गरोदर माता यांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.

जास्तीचे वजन आणि लट्ठपणा

[संपादन]

एखाद्या व्यक्तीचे वाजत त्याच्या उंचीच्या प्रमाणापेक्षा खूप जास्त असणे म्हणजे जादा वजन आणि लट्ठपणा. जास्तीच्या वजनामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो.

कारणे

[संपादन]
  • लवकर अंगावरील दूध पाजणे बंद करणे.
  • दुधाची बाटली पातळ दूध, दुधात साखर न घालणे ही पण कुपोषणाची महत्त्वाची कारणे आहेत.
  • बाळाचा आहार कमी झाल्यावर आणि बाळ सारख सारख आजारी पडत असेल तर ते कुपोषणाचे कारण असू शकते.
  • जन्मताच बाळाचे वजन कमी असेल तर ते कुपोषणाचे कारण असेल.
  • दोन मुलांमध्ये कमी अंतर असणे.
  • बाळाचा नेहमीचाच आहार व्यवस्थीत असला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे
  • जन्म देणारी आई जर कुपोषित असणे

बाळाचे कुपोषण कसे ओळखता येते

[संपादन]
  1. दर महिन्याला आपल्या डॉक्टर कडे किंवा जवळच्या अंगणवाडीत बाळाचे वजन आणि उंची मोजली पाहिजे.
  2. अंगणवाडीत जागतिक आरोग्य संस्थेने तयार केलेले बाळाच्या वाढीचे आलेख उपलब्ध असतात. त्या आलेखातील परिमाणांवर आपल्या बाळाचे वजन आणि उंची मोजून बघावे. यासाठी आपले डॉक्टर आणि अंगणवाडी सेविका यांची मदत घ्यावी.

उपाय योजना

[संपादन]

कुपोषण होऊ नये यासाठी बाळाचे पूर्ण पोषण होणे गरजेचे आहे. म्हणजेच कुपोषण टाळता आले पाहिजे , यासाठी पुढील उपाय योजना करता येतील

  1. मुलीचे लहान वयात लग्न करू नये. पहिले बाळंतपण वयाच्या २०व्या वर्षानंतर झाले पाहिजे
  2. गरोदरपणात आईची काळजी घेतली गेली पाहिजे. अतिश्रम नको, सकस आहार मिळाला पाहिजे, तसेच आवश्यकतेनुसार अंगणवाडीतील पोषक आहार देखील मिळाला पाहिजे. आवश्यकतेनुसार पुरेशी विश्रांती मिळाली पाहिजे.
  3. जवळच्या सरकारी किंवा खाजगी दावाखानायातच बाळांतपण झाले पाहिजे. भारत सरकारच्या RCH पोर्टलवर मातेची नोंदणी झाली पाहिजे.
  4. बाळाच्या जन्माच्या पहिल्या एक तासात मातेचे पहिले चिकाचे दुध बाळाला दिले गेले पाहिजे . हे बाळाचे पहिले लसीकरण आहे. या दुधामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
  5. यानंतर बाळ ६ महिन्याचे होई पर्यंत फक्त मातेचे दूधच बाळाला दिले गेले पाहिजे. किमान ८ ते १० वेळा स्तनपान केले गेले पाहिजे. बाळाचे कपडे, बाळाची झोपण्याची जागा स्वच्छ ठेवावी.
  6. घर , परिसर स्वच्छ ठेवावा.
  7. ६ महिन्या नंतर बाळाला देण्याचा आहार तयार करताना हात स्वच्छ धुणे बाळाला खाऊ घालताना हात स्वच्छ करावे. अन्न ताजे दिले पाहिजे.
  8. ६ महिने ते १ वर्षाच्या बाळाला दर दोन तासांनी किंवा बाळाच्या मागणी नुसार पूरक आहार दिला गेला पाहिजे. गोड खिरी, भाताची भरड किंवा डाळीचे वरण देताना त्यात तेलाचा व तुपाचा भरपूर वापर केला पाहिजे.
  9. बाळ २ वर्षाचे पूर्ण होईपर्यंत पूरक आहाराबरोबरच आईचे दुध देखील बाळाला वेळोवेळी दिले गेले पाहिजे.
  10. बाळाच्या आहारात गुळाचा वापर केला पाहिजे .
  11. बाटलीचे दुध देऊ नये . त्याने बाळाला सतत जुलाब होण्याची शक्यता असते
  12. गुरांचा गोळा बाळाच्या राहत्या ठिकाणापासून लांब असावा.
  13. बाळाचे वजन, उंची वेळोवेळी डॉक्टरांकडून तपासली पाहिजे किंवा जवळच्या अंगणवाडीत जाऊन तपासली पाहिजे.
  14. बाळ २ वर्षाचे होईपर्यंत बाळाचे संपूर्ण लसीकरण झाले पाहिजे. जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेले व राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात सांगितलेले सर्व लसीकरण झाले पाहिजे. हे लसीकरण जवळच्या सरकारी दवाखान्यात विनामूल्य केले जाते. त्यासाठी अवाजवी किंमत मोजू नये. जवळ सरकारी दवाखाना नसेल तर घराजवळच्या अंगणवाडी सेविकेच्या मदतीने लसीकरण पूर्ण करून घ्यावे
  15. मुलगा मुलगी भेदभाव न करता प्रत्येक बालकाचे पोषण व्यवस्थित झाले पाहिजे
  16. मुलांच्या खाण्यात सर्व पोषक घटक असले पाहिजेत याकडे लक्ष द्यावे
  17. शक्य असल्यास मुलांना मांस , अंडी खाण्यास द्यावी.
  18. बाळाची भूक कमी झाली तर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्या , घरगुती उपाय करू नये
  19. बाळाला शक्यतो कोरडे अन्न देऊ नये, पचण्यास त्रास होऊ शकतो.
  20. जसे बाळ अशक्त होऊ नये यासाठी काळजी घ्यायची आहे तशीच बाळ लट्ठ होणार नाही यासाठी पण काळजी घेतली पाहिजे. बाळाला फक्त घरी तयार केलेलेच अन्न खायला घातले पाहिजे.
  21. मुलांचा पुरेसे खेळणे झाले पाहिजे, त्यामुळे बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत होते.
  22. दर ६ महिन्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला जंताचे औषध दिले गेले पाहिजे.
  23. मुलांच्या आजारपणात त्यांचे अन्न तोडू नये, या कालावधीत बाळाला पचायला हलके अन्न देण्यात यावे.

आहारातील महत्त्वाचे अन्न घटक

[संपादन]
  1. कर्बोदके: शरीराच्या विविध कार्यासाठी उर्जा देण्याचे काम कर्बोदके करतात. जास्त प्रमाणात कर्बोदकांचे सेवन केल्यास लट्ठपणा येतो, कमी प्रमाणात सेवन केल्यास अशक्तपणा येतो.सर्व प्रकारचे तृणधान्य, बटाटे, रताळे, फळ , गुळ ,साखर, मध, गहू, बाजरी, मका, तांदूळ , ज्वारी, साबुदाणा,भगर व अन्य उपवासाचे पदार्थ.
  2. प्रथिने : स्नायुंच्या बळकटी साठी व शरीराच्या वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते.सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये, मांस , अंडी यातून मिळते
  3. जीवनसत्त्वे: प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, हार्मोन्स आणि enzymesच्या विकासासाठी आवश्यक असतात. सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, फळ यातून जीवनसत्त्वे मिळतात.
  4. खनिजे : लोह, कॅल्शियम ही खनिजे मानवाच्या वाढीसाठी सहाय्य करतात. लोहामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण संतुलित ठेवण्यास मदत मिळते. कॅल्शियम हाडांच्या व दातांच्या वाआधीसाठी व आरोग्यासाठी आवश्यक आसते.

जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होणारे आजार

[संपादन]
  • “अ” जीवनसत्त्व: “अ” जीवनसत्त्वाच्या अभावामुळे रातांधळेपणा येतो.

उपाय :यासाठी बाळ ५ वर्षाचे होईपर्यंत “अ” जीवनसत्त्वाचा डोस” दर ६ महिन्यांनी दिला जावा. दैनंदिन आहार्त हिरव्या पालेभाज्या विशेषतः शेवग्याचा पाला, पालक मेथी, इत्यादी पाले भाज्यांचा समावेश असावा. तसेच रंगीत फळे उदा. गाजर, tomato, पापी, आंबा भोपळा यांचा समावेश आहारात असावा. मांस , अंडी, प्राण्यांचे यकृत यात “अ” जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते.

  • “ड” जीवनसत्त्व : “ड” जीवनसत्त्वाच्या अभावामुळे हाडे ठिसूळ होतात. मुडदूस हा आजार होतो. यात बाळाचे कपाळ मोठे होते, घाम जास्त येतो, बाळाची शारीरक वाढ होत नाही, सांधे सुजल्यासारखे दिसतात, बाळ वर्षाचे होऊन गेले तरी उभे राहू शकत नाही , त्याचे चालण्याचे वय लांबते, छातीच्या फासळ्या व पायांना बाक येतो, पोट मोठे दिसते.

उपायः दुध, माशाचे तेल, अंडी, मांस, इत्यादी आहार सुरू करणे, सकाळच्या कोवळ्या उन्हात बाळाला ठेवणे. आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने “ड” जीवनसत्त्वाची पुडी दुधातून द्यावी. व “ड” जीवनसत्त्वाचा डोसा ६ महिन्यातून एकदा द्यावा

  • “ब” जीवनसत्त्व”: “ब” जीवनसत्त्वाचा अभावामुळे सतत तोंड येते, गालावर चट्टे येतात, ओठांच्या कदा चिरतात.

उपायः हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये (मुग, वाटाणे, मटकी, हरभरे), दुध यांचा आहारात समावेश करावा. तांदूळ गहू यांच्या बाहेरील आवरणात “ब” जीवनसत्त्व असते. कोंडा काढून टाकला तर “ब” जीवनसत्त्व निघून जाते, तांदूळ खूप धुऊन घेतले तर तांदळातले “ब” जीवनसत्त्व निघून जाते. “ब” जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा . आवश्यकतेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या किंवा औषध घ्यावे.

  • “क” जीवनसत्त्व :

लक्षणे व रोगनिदान : सुरुवातीला रोगप्रतिकारक शक्ती कमी पडते, रक्तपांढरीची लक्षणे दिसू लागतात. रक्तवाढीसाठी लोह, “ब” जीवनसत्त्व, “क” जीवनसत्त्व आणि प्रथिने यांची गरज असते. “क” जीवनसत्त्वाचा अभाव जास्त झाल्यास हाडांना सूज येते व ही हाडे दुखू लागतात. त्यामुळे बाळाला हात लावला तरी बाळ रडते, आईने उचलून घेण्याचा प्रयत्न केला तरी बाल रडते. छातीच्या फासळ्या दुखतात, सांधे दुखतात, हिरड्या सुजतात व त्यातून रक्त येते.

कुपोषणावरील उपचार

[संपादन]

रक्तपांढरी (ऍनिमिया) - भारतात शाळापूर्व वयोगटातील ६०% पेक्षा जास्त बालकांमध्ये रक्तपांढरीची लक्षणे आढळतात. रक्तातील लालपणा व प्राणवायू सर्व शरीरात पोहोचवण्याची क्षमता तांबड्या पेशींवर अवलंबून असते. तांबड्या पेशींचा लालरंग हा हिमोग्लोबिन या रक्तद्रव्यावर अवलंबून असतो. हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह, प्रथिने, “ब” आणि “क” जीवनसत्त्वांची आवश्यकता असते. त्यामुळे दैनंदिन आहारातील या घटकांच्या कमतरतेमुळे रक्तपांढरी हा आजार होतो. या शिवाय आव, जंत इत्यादी कारणांनी रक्तस्त्राव झाल्यास, वारंवार मलेरिया झाल्यास रक्तपांढरी हा आजार होऊ शकते.बाळाच्या शरीरात ६ महिने पुरेल इतके लोह असते, त्यामुळे ६ महिन्यापर्यंतच्या बालकांमध्ये सहसा हा आजार दिसत नाही. दुधात लोह क्षार व “क” जीवनसत्त्वाची कमतरता असते. ६ महिन्यांनी बाळाला वरचे पोषक अन्न सुरू केले नाही तर शरीरातील लोहाचा साठा कमी होतो.बाळाच्या आईला रक्तपांढरी झाली असेल तरी देखील बाळामध्ये ही लक्षणे दिसून येतात.

  • रक्तपंढरीची लक्षणे : बाळ माती खायला सुरुवात करते, भूक मंदावते, चेहरा निस्तेज होतो, नखांवर पांढरेपणा जाणवतो. यामुळे बाळ वारंवार आजारी पडते.

लिंबूवर्गीय फळांमध्ये “क” जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असते. लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा इत्यादी लिंबू वर्गीय फळे खाल्ल्याने “क” जीवनसत्त्व मिळते. “क” जीवनसत्त्वाच्या गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता येतात.

कुपोषण थांबवण्यासाठी सर्व प्रथम बालकाच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे .बालकाच्या जन्मापासून पहिला एक ते दीड महिना बाळाला आईचेच दूध पाजले पाहिजे . त्यानंतर बाळाला पोषक अशी घूटी देणे गरजेचे आहे . घुटीमध्ये पोषक अशा पदार्थांचा समावेश असला पाहिजे.

रात्री 50 ग्रॅम मनुका पाण्यात भिजवून सकाळी चांगले धुऊन घ्या आणि खा. नियमितपणे 2-3 महिने ही प्रक्रिया केल्यास तुम्ही तीन महिन्यांत कुपोषणमुक्त व्हाल आणि तुमचे वजनही वाढेल.आपल्या अन्नातील प्रथिनेंचे प्रमाण वाढवा.डाळी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे, म्हणून आपल्या आहारात अधिक डाळींना परवानगी द्या.

गरोदर पानात आईला लोह व कॅल्शियमचा आहार नियमितपणे देणे. ironfolic acid supplement घेणे, आहारात हिरव्या पालेभाज्या, फळ, अंडी, मांस, लिंबू याचा समावेश असावा. जेवणानंतर किंवा नाश्त्या नंतर लगेच चहा घेऊ नये.स्वच्छ प्रसाधनगृहांचा वापर करणे, काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे इत्यादी सवयी लावणे बाळाची नखे वरचेवर स्वच्छ ठेवणे, कापणे, बाहेर जाताना बाळाच्या पायात चप्पल किंवा बूट असावेत.

डॉक्टरांचा सल्ला वेळेत घेणे, त्यांनी सुचवलेली औषधे नियमित व सांगितलेल्या प्रमाणात बाळाला देणे.आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, अंडी, मांसाहारी पदार्थ वाढवणे.स्वच्छता ठेवणे, लसीकरण ठरलेल्या वेळेत पूर्ण करणे.

संदर्भ[][]

[संपादन]
  1. ^ "Malnutrition". www.who.int (इंग्रजी भाषेत). 2020-03-31 रोजी पाहिले.
  2. ^ "WHO | What is malnutrition?". WHO. 2020-03-31 रोजी पाहिले.