Jump to content

सवाष्ण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ज्या महिलेचा पती हयात आहे अशा महिलेला सुवासिनी किंवा मराठीत सवाष्ण असे म्हणले जाते. महाराष्ट्रात सतीचे दगड आढळतात. ज्यामध्ये एखादी स्त्री पतीसह सती गेली असेल तर तिचा गौरव म्हणून असे दगड घडविले जात. या दगडावर बांगड्या भरलेला सुवासिनीचा हात कोरलेला असतो. बाजूला चंद्र-सूर्यही कोरलेले असतात.जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या सुवासिनीचे स्मरण होत राहील असा भाव त्यामागे असतो. सवाष्ण हा शब्द विवाहित स्त्री दर्शवितो आणि त्याच्या विरोधात विधवा स्त्रीची प्रतिमा उभी करतो. १९ व्या शतकामध्ये सवाष्ण असणे हे स्त्रियांच्या स्वाभिमानाची स्थिती दर्शवत होते.

संस्कृती

[संपादन]

वटपौर्णिमा

[संपादन]

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करतात.

सवाष्ण ब्राह्मण

[संपादन]

हळदीकुंकू-

[संपादन]

महाराष्ट्रात हळदीकुंकवाची विशेषत्वाने परंपरा आहे. साधारणपणे संक्रातीच्या निमित्ताने ह्यास सुरुवात होते. संक्रांतीच्या हळदीकुंकवात सुगडाचे वाण देण्याची प्रथा आहे. चैत्र महिन्यात आणि गौरीपूजनाच्या निमित्ताने देखील हळदीकुंकवाला सवाष्ण स्त्रियांना बोलावले जाते. पूर्वीच्या काळी स्त्रियांना फारसे घराबाहेर पडता येत नव्हते पण ह्या निमित्ताने स्त्रिया एकत्र येत असत. त्यांना मोकळेपणाने चर्चा करता येत असे. स्वतःच्या सुखदुःखांविषयी बोलता येत असे.