गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. अगदी सुरवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

भारतात दर वर्षी सुमारे दीड लाख रुग्ण आढळून येतात व उशिरा निदान झाल्याने यातील 22 हजार रुग्णांना जीव गमवावा लागतो. मुंबईतील टाटा मेमोरिअल सेंटर च्या शास्त्रज्ञांनी कमी खर्चातील शोध व निदान करण्याचे तंत्र विकसीत केले आहे. या तंत्राद्वारे भारतासारख्या विकसनशील देशातील गरीब रुग्णांना अगदी सुरवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान आर्थिकदृष्ट्या परवडणारे झाले आहे.