महिला व बाल कल्याण समिती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महिला व बाल कल्याण समिती ची स्थापना जुन १९९३ मध्ये महिला व बाल विकास विभागाची स्वतंत्र प्रशासकीय विभाग म्हणून केली. महिला आणि बालक यांचे जगणे, सुरक्षा, विकास आणि समाजात सहभाग या बाबी समग्रपणे झाल्या पाहिजेत यावर लक्ष केंद्रित करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे .धोरण तयार करणे, योजना तयार करणेविकास योजनांची अंमलबजावणी करणे ही या विभागाची दायित्वे आहेत.महाराष्ट्रात ११.२ कोटी नागरीक वास्तव्य करीत आहेत.यामध्ये महिलांची संख्या साधारण ५.४१ कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या ४८% आहे.बालकांची (0-६ वर्षे वयोगट) संख्या साधारण १.३३ कोटी म्हणजे एकूण लोकसंख्येच्या १२% आहे.0-६ वर्षे वयोगट लिंगदर ८९४ आहे.