राष्ट्रीय महिला आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

राष्ट्रीय महिला आयोग (इंग्लिश: national commission for Women - NSW) ही भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार भारत सरकारने १९९२ मध्ये स्थापन केलेली वैधानिक संस्था आहे. १९९० च्या राष्ट्रीय महिला आयोग कायद्याद्वारे तिची स्थापना करण्यात आली.

आयोगाची रचना[संपादन]

आयोगाच्या स्थापनेसंबंधी कायद्यानुसार. आयोगात एक अध्यक्ष (चेअरपर्सन) आणि पाच सदस्य असतात. चेअरपर्सन आणि सदस्य हे तीन वर्ष कमाल मुदतीसाठी केंद्र सरकारमार्फत नियुक्त केले जातात. या विषयात आस्था आणि कार्य केलेल्यांची नियुक्ती यासंदर्भात केली जाते. पाचपैकी किमान एक सदस्य अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीतून नियुक्त केला जातो. एक सदस्य सचिवही आयोगावर केंद्र सरकारमार्फत नियुक्त केला जातो. सदस्य सचिव हा नागरी सेवा किंवा केंद्र सरकारच्या कोणत्याही नागरी सेवेतील व्यक्ती असतो आयोगाची कार्यकक्षा जम्मू आणि काश्मीरचे राज्य वगळता संपूर्ण भारत आहे. आयोगाला जरूरीनुसार कार्यालय, कर्मचारीवर्ग आणि इतर सुविधा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. राष्ट्रीय महिला आयोगाचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत आहे. श्रीमती ममता शर्मा या आयोगाच्या अध्यक्ष आहेत. २०१४ पासुन ललिता कुमारमंगलम या अध्यक्षा आहेत

आयोगाची कार्ये[संपादन]

आयोगाच्या कार्याची पुढील चार महत्वाची वैशिष्ट्ये आहेत.

  1. महिलांसाठी संवैधानिक आणि विधीविषयक सुरक्षा उपायांचा आढावा घेणे.
  2. कायदेमंडळाला उपायांबद्दल शिफारस करणे.
  3. गाऱ्हाणी दूर करण्याचा मार्ग सुकर करणे.
  4. महिलांना प्रभावित करणाऱ्या सर्व धोरणात्मक बाबींवर सरकारला सल्ला देणे.


बाह्य दुवे[संपादन]

  1. राष्ट्रीय महिला आयोगाचे अधिकृत संकेतस्थळ