Jump to content

पॅप स्मिअर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पॅप स्मिअर टेस्ट या पानावरून पुनर्निर्देशित)
जननक्षम महिलेच्या पॅप स्मिअरमध्ये दिसणाऱ्या पेशी

पॅप स्मिअर(Pap Smear) ही एक गर्भाशयाच्या मुखाची तपासणी आहे.

तपासणी

[संपादन]

ही एक गर्भाशयाच्या मुखाची तपासणी आहे. ही तपासणी ग्रीक वैद्यक जी.एन. पॅपिनिकोलाव्ह यांनी शोधली. त्याच्या स्मरणार्थ पॅप स्मिअर नाव दिले गेले आहे. गर्भाशयाच्या मुखावरील आवरणातील पेशी पॅप स्मिअर या तपासणीत पाहिल्या जातात व तेथे कर्करोग होण्याची शक्‍यता अथवा सुरुवात सापडू शकते की जी कर्करोगाचे उपचार अधिक प्रभावी करतात.

तपासणी कोणी करावी?

[संपादन]
कर्करोग असणऱ्या महिलेच्या पॅप स्मिअरमध्ये दिसणाऱ्या पेशी

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर (कर्करोग) हा भारतात खूप प्रमाणात आहे. दरवर्षी १,३२,००० नवीन रुग्ण या आजाराने पिडीत होतात आणि ७४,००० स्त्रिया मृत्युमुखी पडतात. गर्भाशयाच्या मुखाच्या आजाराची लक्षणे लवकर दिसत नाहीत.

  • ४० वर्षांवरील सर्व महिला,
  • गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा कौटंबिक इतिहास
  • खाद्या स्त्रीची रोगप्रतिकारकशक्ती खूपच कमी असेल
  • धूम्रपान करत असेल
  • गुप्तांगांची स्वच्छता ठेवत नसेल
  • गुप्तरोग झाला असेल

तपासणी पद्धती

[संपादन]

गर्भाशयाचं तोंड तपासतात व ब्रशने किंवा आर्यस स्पॅच्युलाने किंवा कापसाच्या स्नॅबने नमुना घेतला जातो. आर्यस स्पॅटुला पूर्णगोल फिरविला जातो. त्याला काचपट्टीवर ठेवून अल्कोहोलच्या साहाय्याने फिक्स केले जाते व पॅपच्याद्रावणाने रंगीत करून सुक्ष्मदर्शकाखाली तपासले जाते.

बाह्यदुवे

[संपादन]

पॅप तपासणी-महाराष्ट्र टाइम्स[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती