अवटु ग्रंथि

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
थायरॉईड ग्रंथी

अवटु ग्रंथि अथवा थायरॉईड ही एक लहान अंतःस्रावी ग्रंथी असून तिचा आकार एका फुलपाखरासारखा असतो आणि ती मानेच्या खालच्या भागात थायरॉईड कार्टिलेजच्या खाली स्थित असते. ग्रंथी थायरॉक्सिन(टी४), ट्रायोडोथायरोनाईन(टी३) व कॅल्सिटोनिन ही संप्रेरके निर्माण करते. थायरॉक्सिन व [ट्रायोडोथायरोनाईन]] हे आपल्या शरीराच्या वाढ चयापचयसाठी महत्त्वाचे असतात. या ग्रंथीचे कार्य पीयूष ग्रंथिद्वारे विनियमित केले जाते.