विकिपीडिया:धूळपाटी/मुखपृष्ठ
|
मासिक सदरलंडन (इंग्लिश: London ) हे इंग्लंडचे व युनायटेड किंग्डमचे राजधानीचे व सर्वात मोठे शहर तसेच युरोपियन संघामधील सर्वात मोठे महानगर क्षेत्र आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या ह्या शहराला २,००० पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे. लंडन हे अर्थ, कला आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये जगातील एक प्रमुख शहर आहे. न्यू यॉर्क शहर व टोकियोसोबत लंडन हे जगातील सर्वात शक्तिशाली आर्थिक केंद्र मानले जाते.तसेच युरोपातील सर्वात मोठे अर्थव्यवस्था असलेले शहर हा मान देखील लंडनकडेच जातो. जगातील सर्वाधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक लंडनमध्ये येतात तसेच लंडन हीथ्रो विमानतळ हा आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूकीसाठी जगातील सर्वात मोठा विमानतळ आहे. २०१२ सालच्या ऑलिंपिक स्पर्धा लंडनमध्ये भरवल्या गेल्या. ह्या स्पर्धांचे तिसऱ्यांदा आयोजन करणारे लंडन हे जगातील एकमेव शहर आहे. जुलै २०१० मध्ये ७८,२५,२०० इतकी लोकसंख्या असलेले लंडन युरोपामधील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर होते. ग्रेटर लंडनची लोकसंख्या ८२,७८,२५१ तर लंडन महानगर क्षेत्राची लोकसंख्या अंदाजे १.२ ते १.४ कोटी आहे. लंडन शहराच्या समाजरचनेत कमालीचे वैविध्य आढळते. लंडन परिसरात ३०० भाषा बोलल्या जातात. सध्या लंडन परिसरात राहणारे ६.६ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. लंडन हे नाव इ.स.च्या पहिल्या शतकापासून वापरात आहे. या सुमारास हे नाव लंडनियम असे लॅटिनीकृत केले जात असे. इतर भाषांमध्ये हे लुंडेन (जुने इंग्लिश), लुंडैन (वेल्श) किंवा लंडन्योन (केल्टिक) असे वापरले जात असे. य केल्टिक नावाचे इंग्लिश आणि लॅटिनमध्ये लंडन असे रुपांतरण झाले. १८८९पर्यंत फक्त लंडन शहराला लंडन असे संबोधले जात असे. त्यानंतर लंडन काउंटी तसेच बृहद् लंडन परिसराला लंडन नावाने ओळखतात. थेम्स नदीवरील वॉक्सहॉल पूलाजवळच्या भागात सापडलेल्या एका प्राचीन पूलाच्या अवशेषांच्या कार्बन-डेटिंगनुसार इस.पू. १७५०-१२८५ दरम्यानचे असल्याचे सिद्ध झाले आहे. येथून जवळच एका लाकडी इमारतीच्या पायाचे अवशेष इ.स.पू. ४८००-४५०० च्या सुमारास असल्याचे आढळले आहे. ही दोन्ही ठिकाणे पूर्वीच्या रिव्हर एफ्रा या नदीच्या थेम्सशी होणाऱ्या संगमाजवळ आहेत. लंडन शहर आता असलेल्या ठिकाणी ज्ञात इतिहासातील पहिली वसाहत इ.स. ४७च्या सुमारास होती. इ.स. ४३मध्ये रोमन साम्राज्याने या प्रदेशावर आक्रमण करून येथे ठाण मांडले व चार वर्षांत ही वस्ती उभी केली. याला लंडनियम असे नाव होते. इ.स. ६१मध्ये स्थानिक इसेनी जमातीने आपल्या राणी बूडिकाच्या नेतृत्त्वाखाली यावर हल्ला केला व लंडनियम बेचिराख केले. मागील अंक: नोव्हेंबर २०२३ - एप्रिल २०२३ - ऑगस्ट २०१९ - जून २०१९ - एप्रिल २०१९ - मार्च २०१९ - जानेवारी २०१९ - नोव्हेंबर २०१८ - मे २०१८ - मार्च २०१८ - महिला दिवस, २०१८ - २०१७ मधील सदर लेख - २०१६ मधील सदर लेख - २०१५ मधील सदर लेख - २०१४ मधील सदर लेख- २०१२ मधील सदर लेख - २०१२ मधील सदर लेख - २०११ मधील सदर लेख - २०१० मधील सदर लेख - २००९ मधील सदर लेख - २००८ मधील सदर लेख - मागील अंक
|
|
थोडक्यात 'विकिपीडिया' प्रकल्पाविषयी
|
निवेदनमराठी विकिपीडियाची प्रगती सातत्याने होत आहे. ही गती वाढविण्यासाठी आणि विकिपीडियातील मजकूर अधिक गुणवत्तेचा तसेच परिपूर्ण करण्यासाठी आपला सहयोग अतिमहत्त्वाचा आहे. यासाठी पुढील काही गोष्टी आपण करु शकता:
|
विकिपीडियाचे सहप्रकल्प |