मार्सिलियो फिचिनो
Appearance
मार्सिलियो टी. फिचिनो (१९ ऑक्टोबर, १४३३ - १ ऑक्टोबर, १४९९) हा एक मध्ययुगीन इटलीमधील विद्वान आणि कॅथोलिक धर्मगुरू होता. याचा इटलीतील रिनैसाँवर मोठा प्रभाव होता. इतर विद्यांखेरीज फिचिनो ज्योतिषी ही होता. त्याने प्लेटोच्या संपूर्ण लेखनाचा लॅटिनमध्ये पहिल्यांदा अनुवाद केला. [१]
फिचिनोचा जन्म फिल्यिने वाल्दार्नो येथे झाला. त्याचे वडील हे फिरेंझेच्या शास कोसिमो दे मेदिची आश्रयाखाली एक वैद्यकीय चिकित्सक होते. कोसिमोने मार्सिलियोला आपल्या घरातलाच मानला आणि त्याला आजीवन आश्रय दिला. मार्सिलियो कोसिमोच्या नातू, लॉरेंझो दे मेदिचीचा शिक्षक होता. जियोव्हानी पिको देल्ला मिरांदोला हा इटालियन मानवतावादी तत्वज्ञानी आणि विद्वानही फिचिनोचा विद्यार्थी होता. [२]
मृत्यू
[संपादन]फिचिनो १ ऑक्टोबर, १४९९ रोजी करेज्जी येथे मृत्यू पावला.