मेदिची घराणे
royal family | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | noble family, royal family | ||
---|---|---|---|
स्थान | Duchy of Florence | ||
भाग |
| ||
| |||
मेदिची[१] घराणे हे इटलीमधील सावकार, बँकर आणि राजकारणी घराणे होते. १५व्या शतकात कोसिमो मेदिची आणि लॉरेंझो इल मॅग्निफिको यानी सुरुवाली फिरेंझेमध्ये सत्ता मिळवली. कालांतराने इटली आणि युरोपमधील प्रमुख सत्ताकेंद्रांमध्ये मेदिचींचा थेट प्रभाव होता. बांको दै मेदिची ही युरोपातील सगळ्यात मोठी बँक यांच्या मालकीची होती.
१५३२मध्ये मेदिचींनी दुका देल्ला रिपब्लिका फियोरेंतिना (फ्लोरेन्सचे ड्यूक) ही वंशपरंपरागत पदवी मिळवली. १५६९मध्ये अधिक मोठ्या प्रदेशावरील ग्रांदुकातो दि तोस्काना (तोस्कानाचे ग्रँड ड्यूक) हे पद त्यांनी धारण केले. ही जहागिर १७३७पर्यंत या घराण्यात होती. मेदिची घराण्याचे चार पुरुष कॅथोलिक पोप झाले -- पोप लिओ दहावा (१५१३-१५२१), पोप क्लेमेंट सातवा (१५२३-१५३४), पोप पायस चौथा (१५५९-१५६५) आणि पोप लिओ अकरावा (१६०५). मेदिची घराण्याच्या दोन स्त्रीया फ्रांसच्या राण्या झाल्या — कॅथरीन दे मेदिची (१५४७-१५५९) आणि मेरी दे मेदिची (१६००-१६१०). मेदिची घराण्याने अनेक पिढ्या आर्थिक आणि राजकीय भरभराट पाहिली परंतु कोसिमो तिसरा दे मेदिची च्या काळात ते दिवाळखोर झाले आणि ज्यान गास्तोनेच्या मृत्यूनंतर निर्वंश झाले
१३९७मध्ये सुरू झालेली बांको दै मेदिची १४९४मध्ये कोसळेपर्यंत युरोपातील सगळ्यात प्रसिद्ध आणि समृद्ध बँकांपैकी एक होती. मेदिचींनी सर्वप्रथम द्विनोंदी पद्धत वापरणे सुरू केले, ज्याद्वारे व्यापारातील देवघेवींचा अचूक ताळमेळ बसतो. ही पद्धत वापरल्याने पैशांचा अपव्यय किंवा गोंधळ झाल्यास तो त्वरित शोधून काढता येतो. याशिवाय व्यापारातील देणी आणि लेणी यांचा हिशोब ठेवण्यासाठी जनरल लेजर प्रणाली वापरणाऱ्यांपैकी मेदिची बँक आणि त्यांचे इतर व्यवसाय अग्रगण्य होते.
मेदिची घराण्याने व्हॅटिकन सिटीमधील सेंट पीटर बॅसिलिका आणि फिरेंझेमधील कॅताद्राले दि सांता मारिया देल फियोरे बांधण्यासाठी अमाप पैसा ओतला. हे घराणे दोनातेल्लो, ब्रुनेलेशी, बोत्तिचेल्ली, लिओनार्दो दा विंची, मिकेलेंजेलो, राफेल, मॅकियाव्हेली, गॅलिलिओ, फ्रांचेस्को रेदी यांसारख्या ख्यातनाम कलावंत आणि शास्त्रज्ञांचे आश्रयदाते होते. मेदिची घराण्याचे पियानोचा शोध लागण्यात [२] आणि आणि ऑपेराचा विकास होण्यात मोठे योगदान होते. [३]
मेदिची कुटुंबप्रमुख
[संपादन]फिरेंझेच्या प्रजासत्ताकाचे सिन्योरे
[संपादन]चित्र | नाव | पासून | पर्यंत | मागील प्रमुखाशी नाते |
---|---|---|---|---|
कोसिमो दे मेदिची (पितृभूमीचा पिता) |
१४३४ | १ ऑगस्ट, १९६४ | जियोव्हानी दि बिक्की दे मेदिचीचा मुलगा. | |
पिएरो दि कोसिमो दे मेदिची | १ ऑगस्ट, १४६४ | २ डिसेंबर, १४६९ | कोसिमो दि मेदिचीचा सर्वात मोठा मुलगा | |
लॉरेंझो दे मेदिची (लॉरेंझो इल मॅग्निफिको) |
२ डिसेंबर, १४६९ | ९ एप्रिल, १४९२ | पिएरो दि कोसिमो दे मेदिचीचा सर्वात मोठा मुलगा | |
पिएरो दि लॉरेंझो दे मेदिची(कमनशिबी पिएरो) | ९ एप्रिल, १४९२ | ८ नोव्हेंबर, १४९४ | लॉरेंझो इल मॅग्निफिकोचा सर्वात मोठा मुलगा. फ्रांसच्या आठव्या शार्लने याला पदच्युत करून गिरोलामो साव्होनारोला आणि नंतर पिएरो सोदेरिनीच्या नेतृत्त्वाखाली धार्मिक शासन बसवले. | |
जियोव्हानी दे मेदिची
(पोप लिओ दहावा) |
३१ ऑगस्ट, १५१२ | ९ मार्च, १५१३ | कमनशिबी पिएरोचा लहान भाऊ. हा पुढे पोप लिओ दहावा झाला. | |
जुलियानो दे मेदिची (नेमूर्सचा ड्यूक) | ९ मार्च, १५१३ | १७ मार्च, १५१६ | कमनशिबी पिएरो आणि जियोव्हानी दि लॉरेंझोचा सगळ्यात लहान भाऊ. लॉरेंझो इल मॅग्निफिकोचा तिसरा मुलगा. | |
दुसरा लॉरेंझो दे मेदिची
(उर्बिनोचा ड्यूक) |
१७ मार्च, १५१६ | ४ मे, १५१९ | जुलियानोचा पुतण्या. कमनशिबी पिएरोचा मुलगा. याची मुलगी कॅथरीन दे मेदिची फ्रांसची राणी झाली. | |
जुलियो दि जुलियानो दे मेदिची
(पोप क्लेमेंट सातवा) |
४ मे, १५१९ | १९ नोव्हेंबर, १५२३ | दुसऱ्या लॉरेंझोचा चुलतभाऊ. लॉरेंझो इल मॅग्निफिकोचा भाउ जुलियानोचा मुलगा. हा पुढे पोप क्लेमेंट सातवा झाला. | |
कार्डिनल इप्पोलितो दे मेदिची | १९ नोव्हेंबर, १५२३ | २४ ऑक्टोबर, १५२९ | जुलियोचा चुलतभाऊ, जुलियानो दि लॉरेंझोचा अनौरस मुलगा. |
दुका दि फिरेंझे (फिरेंझेचे ड्यूक)
[संपादन]चित्र | नाव | पासून | पर्यंत | मागील प्रमुखाशी नाते |
---|---|---|---|---|
अलेस्सांद्रो इल मोरो | २४ ऑक्टोबर १५२९ | ६ जानेवारी १५३७ | कार्डिनल इप्पोलितो दे मेदिचीचा चुलत भाऊ. दुसऱ्या लोरेन्झो दे मेदिचीचा अनौरस मुलगा. | |
पहिला कोसिमो दे मेदिची | ६ जानेवारी १५३७ | २१ एप्रिल १५७४ | अलेस्सांद्रोचा दूरचा चुलत भाऊ. जियोव्हानी दाल्ले बांदे नेरेचा मुलगा. लॉरेंझो दि जियोव्हानी दे मेदिचीचा वंशज. लॉरेंझो इल मॅग्निफिकोचाही नातू. |
ग्रान दुका दि तोस्काना
[संपादन]पोर्ट्रेट | नाव | पासून | पर्यंत | मागील प्रमुखाशी नाते |
---|---|---|---|---|
पहिला कोसिमो दे मेदिची | ६ जानेवारी १५६९ | २१ एप्रिल १५७४ | ||
पहिला फ्रांचेस्को दे मेदिची | २१ एप्रिल १५७४ | १७ ऑक्टोबर, १५८७ | पहिल्या कोसिमो दे मेदिचीचा मोठा मुलगा. | |
पहिला फेर्दिनांदो दे मेदिची | १७ ऑक्टोबर १५८७ | १७ फेब्रुवारी १६०९ | फ्रांचेस्कोचा भाऊ, टस्कनीचा ग्रँड ड्यूक. पहिल्या कोसिमो दे मेदिचीचा दुसरा मुलगा. | |
दुसरा कोसिमो दे मेदिची | १७ फेब्रुवारी १६०९ | २८ फेब्रुवारी १६२१ | पहिल्या फेर्दिनांदोचा मोठा मुलगा. | |
दुसरा फेर्दिनांदो दे मेदिची | २८ फेब्रुवारी १६२१ | २३ मे १६७० | दुसऱ्या कोसिमो दे मेदिचीचा मोठा मुलगा. | |
तिसरा कोसिमो दे मेदिची | २३ मे, १६७० | ३१ ऑक्टोबर १७२३ | दुसऱ्या फेर्दिनांदो दे मेदिचीचा मोठा मुलगा. | |
ज्यान गास्तोन दे मेदिची | ३१ ऑक्टोबर १७२३ | ९ जुलै १७३७ | तिसऱ्या कोसिमो दे मेदिचीचा दुसरा मुलगा. |
मानचिह्ने
[संपादन]मेदिची घराण्याने अनेक मानचिह्ने वापरली. याशिवाय त्यातील व्यक्तींनी स्वतःची वेगळी ओळख दर्शविण्यासाठी वेगवेगळी मानचिह्ने अंगिकारली.
-
काही काळापुरते वापरलेले घराण्याचे चिह्न
-
फ्रांसच्या अकराव्या लुईने दिलेले सुधारित चिह्न त्यावर ३ फ्लुर दि लिस होते.
-
ओत्तायानोच्या मेदिचींचे चिह्न
-
ग्रान दुका दि तोस्काना
-
मेदिची पोप
-
मेदिची कार्डिनल
-
फ्रांसची राणी म्हणून कॅथरीन दे मेदिचीने वापरलेले चिह्न
-
फ्रांसची राणी मारिया दे मेदिची
-
मेदिची घराण्याची महती दर्शविणारे चिह्न
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ साचा:Cite Collins Dictionary
- ^ Pollens, Stewart (2013). "Bartolomeo Cristofori in Florence". The Galpin Society Journal. 66: 7–245. ISSN 0072-0127. JSTOR 44083109.
- ^ "Music and the Medici – The Medici Archive Project" (इटालियन भाषेत). 2023-01-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-04-20 रोजी पाहिले.
मेदिची घराणे House of Medici
| ||
New title | {{{title}}} | {{{reason}}} |
New title | {{{title}}} | पुढील {{{after}}} |