भूमध्य समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भू-मध्य समुद्र या पानावरून पुनर्निर्देशित)
भूमध्य समुद्राचा राजकीय नकाशा

भूमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग व पृथ्वीवरील एक प्रमुख समुद्र आहे. हा समुद्र चारही बाजूंनी जमिनीने वेढला गेला असून त्याच्या उत्तरेस युरोपअनातोलिया तर दक्षिणेस आफ्रिका खंड आहेत. भूमध्य समुद्र पश्चिमेला जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने अटलांटिक महासागरासोबत जोडला गेला आहे. डार्डेनेल्झबोस्फोरस ह्या सामुद्रधुन्या भूमध्य समुद्राला मार्माराच्या समुद्रासोबतकाळ्या समुद्रासोबत जोडतात. तसेच इजिप्तमधील सुएझ कालवा भूमध्य समुद्राला लाल समुद्रासोबत जोडतो.

तांत्रिक दृष्ट्या अटलांटिक महासागराचाच एक भाग असला तरी बरेचदा भूमध्य समुद्र एक वेगळा पाण्याचा साठा समजला जातो. २५ लाख चौरस किमी इतके पृष्ठभागाचे क्षेत्रफळ असलेल्या भूमध्य समुद्राची सरासरी खोली १,५०० मी तर कमाल खोली ५,२६७ मी इतकी आहे.


उपसागर[संपादन]

आंतरराष्ट्रीय जलसर्वेक्षण संस्थेनुसार भूमध्य समुद्राचे खालील विभाग आहेत.

भूमध्य समुद्राचे विभाग
सिसिली व सार्दिनिया: दोन सर्वात मोठी बेटे
सार्दिनियाचा पूर्व किनारा
A view of Raouché off the coast of Beirut, Lebanon
View of the Cinque Terre Mediterranean shoreline, Italy
The beach of la Courtade in the Îles d'Hyères, फ्रांस
Rocky coast of Darnah, Libya


प्रमुख बेटे[संपादन]

खालील दहा भूमध्य समुद्रामधील प्रमुख बेटे आहेत.

ध्वज बेट क्षेत्रफळ लोकसंख्या
इटली Flag of Sicily.svg सिसिली 25,460 5,048,995
इटली Flag of Sardinia, Italy.svg सार्दिनिया 24,090 1,672,804
सायप्रस सायप्रस 9,248 803,147
फ्रान्स Flag of Corsica.svg कोर्सिका 8,680 299,209
ग्रीस क्रीट 8,336 623,666
ग्रीस युबोइया 3,684 218,032
स्पेन Flag of the Balearic Islands.svg मायोर्का 3,640 869,067
ग्रीस लेस्बोस 1,632 90,643
ग्रीस ऱ्होड्स 1,400 117,007
ग्रीस चिओस 842 51,936

ह्या शिवाय माल्टाबालेआरिक द्वीपसमूहामधील मेनोर्काइबिथा ही देखील भूमध्यातील महत्त्वाची बेटे आहेत.

भोवतालचे देश व प्रदेश[संपादन]

एकूण २१ सार्वभौम देश भूमध्य समुद्राच्या भोवताली स्थित आहेत.

तसेच खालील भूभाग देखील भूमध्य समुद्र प्रदेशात मोडतात.


मोठी शहरे[संपादन]

खालील यादीत भूमध्य समुद्रावर (वा जवळ) वसलेली देशांच्या राजधानीची व २ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेली शहरे दिली आहेत.

देश शहरे
स्पेन बार्सिलोना, आलिकांते, कार्ताजिना, मलागा, पाल्मा दे मायोर्का, वालेन्सिया
फ्रान्स मार्सेल, नीस
मोनॅको मोनॅको
इटली बारी, कातान्या, जेनोवा, मेस्सिना, नापोली, पालेर्मो, रोम, तारान्तो, त्रिएस्ते, व्हेनिस
माल्टा व्हॅलेटा
क्रोएशिया स्प्लिट
आल्बेनिया दुर्रेस
ग्रीस अथेन्स, पात्रा, थेसालोनिकी
सायप्रस लिमस्सोल
तुर्कस्तान अदना, अंताल्या, इझ्मिर, मेर्सिन, तार्सुस
सीरिया लटाकिया
लेबेनॉन बैरूत, त्रिपोली (लेबेनॉन)
इस्रायल अशदॉद, हैफा, तेल अवीव
इजिप्त अलेक्झांड्रिया, इजिप्त, बुर सैद
लिबिया बेनगाझी, त्रिपोली (लिबिया)
ट्युनिसिया ट्युनिस
अल्जीरिया अल्जीयर्स, ओराण

हवामान[संपादन]

भूमध्य समुद्राचे व भोवतालच्या भूभागांचे हवामान सौम्य व आर्द्र स्वरूपाचे आहे. येथील उन्हाळे उष्ण व रूक्ष तर हिवाळे सौम्य व पावसाळी असतात. भूमध्य हवामान ऑलिव्ह, द्राक्षे, संत्री इत्यादी पिकांसाठी अनुकूल आहे. ऑलिव्ह तेल, वाईन ही भूमध्य क्षेत्रामधील प्रसिद्ध उत्पादने आहेत. येथील प्रसन्न हवामानामुळे भूमध्य किनाऱ्यावरील अनेक शहरांमधे पर्यटन हा मोठा व महत्त्वाचा उद्योग आहे.

संदर्भ[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: