बुर सैद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बुर सैद
بورسعيد
पोर्ट सैद
इजिप्तमधील शहर

Port Said.jpg

Flag Egy PortSaid.gif
ध्वज
बुर सैद is located in इजिप्त
बुर सैद
बुर सैद
बुर सैदचे इजिप्तमधील स्थान

गुणक: 31°15′N 32°17′E / 31.250°N 32.283°E / 31.250; 32.283

देश इजिप्त ध्वज इजिप्त
प्रांत बुर सैद मुहाफजा
स्थापना वर्ष इ.स. १८५९
क्षेत्रफळ १,३५१.१ चौ. किमी (५२१.७ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६,०३,७८७ (इ.स. २०१०)


बुर सैद, अर्थात पोर्ट सैद, (अरबी: بورسعيد ;) हे इजिप्ताच्या ईशान्येकडील एक बंदराचे शहर आहे. इ.स. १८५९ साली सुएझ कालव्याच्या बांधकामाच्या काळात स्थापले गेलेले हे शहर भूमध्य सागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. इ.स. २०१० सालातील आकडेवारीनुसार बुर सैदाची लोकसंख्या ६,०३,७८७ आहे.

बुर सैद इजिप्तातील महत्त्वाचे बंदर असून कापूस व तांदूळ या निर्यातप्रधान जिनसा येथून परदेशांत निर्यात होतात; तसेच सुएझ कालव्यातून जाणारी बहुसंख्य जहाजे या बंदरात इंधन भरायला थांबतात. बुर सैद करमुक्त बंदर असून, उन्हाळी हंगामात पर्यटकांचा राबता असणारे पर्यटनस्थळ आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत