मार्सेल
मार्सेल Marseille |
|||
फ्रान्समधील शहर | |||
| |||
देश | ![]() |
||
प्रदेश | प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर | ||
विभाग | बुश-द्यु-रोन | ||
क्षेत्रफळ | २४०.६ चौ. किमी (९२.९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०११) | |||
- शहर | ८,५०,६३० | ||
- घनता | ३,५०० /चौ. किमी (९,१०० /चौ. मैल) | ||
- महानगर | १७,२०,९४१ | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.marseille.fr |
मार्सेल (फ्रेंच: Marseille; उच्चार ; ऑक्सितान: Marselha) हे फ्रान्स देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे (पॅरिस खालोखाल) शहर आहे. मार्सेल शहर फ्रान्सच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून ते फ्रान्सचे सर्वात मोठे बंदर आहे. मार्सेल फ्रान्सच्या प्रोव्हॉंस-आल्प-कोत देझ्युर प्रदेशाचे व बुश-द्यु-रोन विभागाचे राजधानीची शहर आहे.२०११ साली मार्सेल शहराची लोकसंख्या सुमारे ८.५ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या १७.२० लाख इतकी होती.
२०१३ साली मार्सेल युरोपियन सांस्कृतिक राजधानीचे शहर होते.
इतिहास
[संपादन]
मार्सेलची स्थापना इ.स.पू. ६००च्या सुमारास मासालिया नावाने झाली. त्यावेळी ग्रीक वसाहत असलेल्या या वस्तीमध्ये सध्याच्या तुर्कस्तानमधील फोसा प्रदेशातील लोक येउन राहिले होते. ग्रीसच्या हेलेनी काळात या वस्तीचे मोठ्या शहरात (पोलिस) रुपांतर झाले.[१] दुसऱ्या प्युनिक युद्धात (इ.स.पू. २१८-२०१)मार्सेलने कार्थेज विरुद्ध रोमन प्रजासत्ताकाची बाजू घेतली. या काळात मार्सेलने आपले स्वातंत्र्य आणि पश्चिम भूमध्य समुद्रामधील व्यापारावरील पकड कायम ठेवली होती. सीझरच्या यादवीत मासालियाने सीझरविरुद्ध बाजू घेतली परिणामी जुलियस सीझरच्या रोमन सैन्याने इ.स.पू. ४९मध्ये मासालियावर चाल करुन शहर जिंकून घेतले.
भूगोल
[संपादन]शहररचना
[संपादन]वाहतूक
[संपादन]कला
[संपादन]शिक्षण
[संपादन]खेळ
[संपादन]ऑलिंपिक दे मार्सेल हा मार्सेलमधील प्रमुख फुटबॉल क्लब असून तो आपले सामने स्ताद व्हेलोद्रोम येथून खेळतो. लीग १ ह्या सर्वोत्तम फ्रेंच लीगमध्ये खेळणाऱ्या मार्सेलने १९९३ सालची युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकली होती.
अर्थव्यवस्था
[संपादन]जुळी शहरे
[संपादन]मार्सेलचे जगातील खालील शहरांसोबत व्यापारी व सांस्कृतिक संबंध आहेत.[२]
संदर्भ
[संपादन]- ^ Patrick Boucheron, et al., eds. France in the World: A New Global History (2019) pp 30–35.
- ^ "Marseille.fr - International – Jumelages". Site Officiel de la Ville de Marseille (फ्रेंच भाषेत). 20 July 2014. 26 November 2008 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |