बोस्फोरस

बोस्फोरस (तुर्की: Boğaziçi, ग्रीक: Βόσπορος, बल्गेरियन: Босфора), किंवा इस्तंबूलची सामुद्रधुनी (तुर्की: İstanbul Boğazı) ही युरोप व आशिया ह्यांची सीमा ठरवणारी एक सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडते. बोस्फोरस व डार्डेनेल्झ ह्या तुर्कस्तानमधील सामुद्रधुन्या जलवाहतूकीसाठी वापरले जाणारे सर्वात अरुंद जलमार्ग आहेत. ह्या दोन सामुद्रधुन्यांमार्फत काळ्या समुद्रापासून एजियन समुद्रापर्यंत (पर्यायाने भूमध्य समुद्रापर्यंत जलवाहतूक शक्य होते.

बोस्फोरसची लांबी ३१ किमी असून कमाल रूंदी ३,४२० मी तर किमान रूंदी ७०४ मी इतकी आहे तर सरासरी खोली २१३ फूट आहे. बोस्फोरसच्या दोन्ही किनाऱ्यांवर इस्तंबूल शहर वसले आहे.
चित्र दालन[संपादन]
-
बोस्फोरसचे मार्माराच्या समुद्रावरील मुख
-
फातिह सुलतान मेहमेट पूल
-
रुमेलिहिसारी
बाह्य दुवे[संपादन]
गुणक: 41°07′10″N 29°04′31″E / 41.11944°N 29.07528°E
![]() |
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |