मार्माराचा समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर्कस्तानच्या नकाशावर मार्माराचा समुद्र, डार्डेनेल्झ (पिवळा रंग) व बोस्फोरस (लाल रंग)

मार्माराचा समुद्र (तुर्की: Marmara Denizi, ग्रीक: Θάλασσα του Μαρμαρά) हा युरोपआशिया ह्यांची सीमा ठरवणारा तुर्कस्तानमधील एक भूमध्य समुद्र आहे. ह्ना समुद्र काळ्या समुद्राला एजियन समुद्रासोबत (पर्यायाने भूमध्य समुद्रासोबत जोडतो. बोस्फोरस ही मार्माराच्या समुद्राला काळ्या समुद्रासोबत जोडणारी सामुद्रधुनी तर डार्डेनेल्झ ही मार्माराच्या समुद्राला एजियन समुद्रासोबत जोडणारी सामुद्रधुनी आहे.

मार्माराचा समुद्र तुर्कस्तानच्या युरोपियन व आशियाई भागांना वेगळा करतो. ह्या समुद्राच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ ११,३५० चौरस किमी तर कमाल खोली १,३७० मी आहे.


बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 40°45′N 28°0′E / 40.750°N 28.000°E / 40.750; 28.000