ऑलिव्ह तेल
Jump to navigation
Jump to search
ऑलिव्ह तेल हे ऑलिव्ह ह्या फळापासुन बनवण्यात येणारे एक तेल आहे. भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेल्या देशांमध्ये ऑलिव्ह फळाचे उत्पादन होते. इटली, स्पेन व ग्रीस ह्या देशांमधील ऑलिव्ह तेल जगात सर्वोत्कृष्ट समजले जाते.
ऑलिव्ह तेल आरोग्यकारी मानले जाते. रोजच्या अन्नात ऑलिव्ह तेलाचा वापर केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो हे सिद्ध झाले आहे.[१] स्वयंपाकाव्यतिरिक्त ऑलिव्ह तेल बाह्यवापराकरिता देखील वापरले जाते (केसांना लावण्यासाठी, मसाज साठी, इत्यादी). तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये, औषधांमध्ये व इंधनासाठी ऑलिव्ह तेलाचा वापर केला जातो.
संदर्भ[संपादन]
- ^ Keys A, Menotti A, Karvonen MJ, et al (December 1986). "The diet and 15-year death rate in the seven countries study". Am. J. Epidemiol. 124 (6): 903–15. पी.एम.आय.डी. 3776973.