द्राक्ष
द्राक्ष ही एक वेलवर्गातील वनस्पती आहे. याच्या दोन जाती आहेत: पिवळी द्राक्षे व काळी द्राक्षे. ही फळे उन्हाळ्यात मिळतात. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे प्रचंड उत्पादन होते. सध्या सांगली जिल्ह्यातील तासगाव,कवठे महांकाळ, मिरज हे तालुकेही द्राक्षे उत्पादनात अग्रेसर आहेत .येथील द्राक्षांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. येथील वातावरण द्राक्षांसाठी व मनुका उत्पादनासाथी अनुकुल आहे. मनुका उत्पादनात भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. द्राक्षे खाण्यासाठी तसेच जाम, जेली, ज्यूस, दारु व मनुका तयार करण्यासाठी वापरतात.द्राक्षे ही मधुर रसाची असतात
द्राक्षापासून बेदाणे तयार केले जातात. बेदाणे खूप दिवस टिकतात.
द्राक्षे हे मूळ आर्मेनियातील पीक आहे. महाराष्ट्रातील द्राक्ष लागवडीसाठी प्रसिद्ध जिल्हे- नाशिक आणि सांगली आहेत. राज्याच्या 50 टक्के द्राक्ष उत्पादन नाशिक मध्ये होते. भारतात द्राक्ष उत्पन्न करणाऱ्या राज्यांमध्ये आघाडीचे राज्य म्हणून महाराष्ट्र प्रसिद्ध आहे. महाग्रेप संस्था शेतकऱ्यांना शीत गोदामे उपलब्ध उपलब्ध करून देते आणि युरोपीय बाजारात द्राक्षे विक्रीसाठी पाठवते.
द्राक्षांच्या जाती
[संपादन]- मर्लो
- शरद
- थॉमसन
- माणिकचमन
- [सोनाक्का]
- [सुपर सोनाक्का]
- अनाबेशाही
- गुलाबी
- बंगलोर पर्पल
- काळी साहेबी
- फकडी
- तास-ए-गणेश
- किशमिश चोर्नी
- माणिक चमन
- फ्लेम सीडलेस
- एस.एस एन
- आर व्ही टी