ब्रातिस्लाव्हा
ब्रातिस्लाव्हा Bratislava |
|||
स्लोव्हाकिया देशाची राजधानी | |||
| |||
देश | स्लोव्हाकिया | ||
प्रदेश | ब्रातिस्लाव्हा | ||
क्षेत्रफळ | ३६७.६ चौ. किमी (१४१.९ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ४४० फूट (१३० मी) | ||
लोकसंख्या (१ जानेवारी २०११) | |||
- शहर | ४,५७,४५६ | ||
- घनता | १,१७३ /चौ. किमी (३,०४० /चौ. मैल) | ||
- महानगर | ७,०२,००० | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
bratislava.sk |
ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाक: Bratislava ; जर्मन: Pressburg पूर्वी Preßburg, हंगेरियन: Pozsony) ही मध्य युरोपातील स्लोव्हाकिया देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या पश्चिम भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ डॅन्युब नदीच्या काठांवर वसले आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे.[१] एकमेकांपासून केवळ ६० किलोमीटर (३७ मैल) अंतरावर स्थित असणारी व्हियेना व ब्रातिस्लाव्हा ह्या युरोपातील भौगोलिक दृष्ट्या सर्वात जवळील राजधान्या आहेत.
ऐतिहासिक काळापासून प्रेसबर्ग ह्या जर्मन नावाने ओळखले गेलेले हे शहर हंहेरीच्या राजतंत्रातील व हाब्जबर्ग साम्राज्यामधील एक प्रमुख शहर होते. १९९३ साली चेकोस्लोव्हाकियाची फाळणी झाल्यावर ब्रातिस्लाव्हा नवीन स्लोव्हाकिया देशाची राजधानी बनली. सध्या ४.५७ लाख शहरी व ७ लाख महानगरी लोकवस्ती असलेले ब्रातिस्लाव्हा हे स्लोव्हाकियाचे आर्थिक, राजकीय व सांस्कृतिक केंद्र आहे.
नावाची व्युत्पत्ती
[संपादन]दहाव्या शतकापासून प्रेसबर्ग (Preßburg) ह्या नावाने ओळखल्या जात आलेल्या शहराचे ब्रातिस्लाव्हा हे नाव ६ मार्च १९१९ रोजी ठेवण्यात आले. इतर भाषांमधील नावे ग्रीक: Ιστρόπολις इस्त्रोपोलिस, चेक: Prešpurk, फ्रेंच: Presbourg, इटालियन: Presburgo, लॅटिन: Posonium, क्रोएशियन: Požun, रोमेनियन: Pojon ही होती. १९१९ सालापर्यंत इंग्लिशमध्ये देखिइल प्रेसबर्ग (Pressburg) हेच नाव वापरात होते.
इतिहास
[संपादन]येथील पहिली मनुष्यवस्ती नवपाषाण युगात सुमारे इ.स. पूर्व ५००० सालामध्ये वसलेली गेली असावी असा अंदाज बांधला जातो. पहिल्या शतकात हे शहर रोमनांच्या तर पाचव्या शतकात स्लाव्ह लोकांच्या अधिपत्याखाली आले. दहव्या शतकादरम्यान प्रेसबर्ग प्रदेश हंगेरीच्या राजतंत्रात विलिन झाला व राज्याचे महत्त्वाचे आर्थिक व प्रशासकीय केंद्र बनले. त्या काळात येथे मोठी प्रगती झाली व शहराचे महत्त्व वाढले. इ.स. १२९१ मध्ये प्रेसबर्गला शहराचा दर्जा देण्यात आला. इ.स. १४०५ साली सिगिस्मंडने प्रेसबर्गला स्वतंत्र शहर नियुक्त केले व स्वतंत्र चिन्ह बाळगण्याची परवानगी दिली.
१६व्या शतकातील ओस्मानांच्या हंगेरीवरील आक्रमणामुळे १५३६ साली हंगेरीची राजधानी प्रेसबर्ग येथे हलवण्यात आली व हे हाब्जबर्ग राजतंत्रामधील प्रमुख शहर बनले. येथे अनेक राजे व प्रमुख चर्चाधिकाऱ्यांचा राज्याभिषेक होउ लागला. १८व्या शतकात मारिया थेरेसाच्या कार्यकाळात प्रेसबर्ग हे हंगेरीमधील सर्वात मोठे शहर होते. ह्या दरम्यान येथे अनेक नवे प्रासाद, राजवाडे, चर्च, नवे रस्ते व इतर उल्लेखनीय वास्तू बांधल्या गेल्या. १८०५ साली ऑस्ट्रिया व फ्रान्समधील तहाचे स्थान असलेले प्रेसबर्ग १८४८ साली ऑस्ट्रियामध्ये जोडले गेले.
पहिल्या महायुद्धानंतर २८ ऑक्टोबर १९१८ रोजी चेकोस्लोव्हाकिया देशाची निर्मिती झाली व ब्रातिस्लाव्हा ह्या नवीन देशाचा भाग बनला. त्यानंतरच्या काळात येथील जर्मन व हंगेरीयन भाषा दडपण्याचे अनेक प्रयत्न झाले व पुष्कळसे हंगेरियन लोक येथून पळाले वा हाकलून लावले गेले. १९३८ साली नाझी जर्मनीने ऑस्ट्रियाला आपल्या भूभागात जोडले व १९३९ साली नव्या स्वतंत्र स्लोव्हाक प्रजासत्ताकावर कब्जा केला. येथील १५,००० ज्यू छळछावण्यांमध्ये धाडले गेले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी ब्रातिस्लाव्हावर बॉंब हल्ला केला व अखेर ४ एप्रिल १९४५ रोजी सोव्हिएत लाल सैन्याने येथे प्रवेश केला.
साम्यवादी पक्षाने १९४८ साली चेकोस्लोव्हाकियाच्या सत्तेवर आल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणावर पायाभुत सुविधा बांधल्या. १९६८ साली स्वातंत्र्याच्या अयशस्वी प्रयत्नानंतर वॉर्सो कराराच्या सैन्याने ब्रातिस्लाव्हामध्ये तळ ठोकला. १९८० च्या शतकामधील कम्युनिस्टविरोधी चळवळीचे ब्रातिस्लाव्हा मोठे केंद्र होते. नोव्हेंबर १९८९ मध्ये घडलेल्या अहिंसक चळवळीमुळे अलेक्झांडर दुब्चेकच्या नेतृत्वाखालील चेकोस्लोव्हाकियाची कम्युनिस्ट राजवट पडली व लोकशाही स्थापन झाली. १ जानेवारी १९९३ रोजी चेकोस्लोव्हाकियाची फाळणी होऊन स्लोव्हाकिया व चेक प्रजासत्ताक हे दोन स्वतंत्र देश निर्माण झाले. त्यानंतर राजधानीचे शहर म्हणून ब्रातिस्लाव्हाचा झपाट्याने विकास झाला आहे.
भूगोल
[संपादन]ब्रातिस्लाव्हा शहर स्लोव्हाकियाच्या नैऋत्य भागात ऑस्ट्रिया व हंगेरी देशांच्या सीमेजवळ स्थित आहे. इतर दोन देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमांजवळ असलेले ब्रातिस्लाव्हा हे जगातील एकमेव राष्ट्रीय राजधनीचे शहर आहे. तसेच चेक प्रजासत्ताकाची सीमा येथून केवळ ६२ किलोमीटर (३८.५ मैल) तर ऑस्ट्रियाची राजधानी व्हियेना केवळ ६० किलोमीटर (३७.३ मैल) अंतरावर आहेत.[२] डॅन्युब नदीच्या दोन्ही काठांवर ३६७.५८ चौरस किमी (१४१.९ चौ. मैल) इतक्या क्षेत्रफळ जमिनीवर वसलेल्या ब्रातिस्लाव्हामधील सरासरी समुद्रसपाटीपासूनची उंची १४० मीटर (४६० फूट) इतकी आहे.[३]
हवामान
[संपादन]ब्रातिस्लाव्हाचे हवामान खंडीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे थंड तर उन्हाळे रूक्ष व कडक असतात.
ब्रातिस्लाव्हा साठी हवामान तपशील | |||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
महिना | जाने | फेब्रु | मार्च | एप्रिल | मे | जून | जुलै | ऑगस्ट | सप्टें | ऑक्टो | नोव्हें | डिसें | वर्ष |
सरासरी कमाल °से (°फॅ) | 2.4 (36.3) |
5.0 (41) |
10.6 (51.1) |
16.0 (60.8) |
21.6 (70.9) |
24.5 (76.1) |
26.9 (80.4) |
26.7 (80.1) |
21.7 (71.1) |
15.4 (59.7) |
7.6 (45.7) |
3.6 (38.5) |
15.17 (59.31) |
सरासरी किमान °से (°फॅ) | −3.5 (25.7) |
−2.2 (28) |
1.3 (34.3) |
4.9 (40.8) |
9.6 (49.3) |
12.9 (55.2) |
14.7 (58.5) |
14.5 (58.1) |
10.7 (51.3) |
5.6 (42.1) |
1.4 (34.5) |
−1.5 (29.3) |
5.7 (42.26) |
सरासरी वर्षाव मिमी (इंच) | 42 (1.65) |
37 (1.46) |
36 (1.42) |
38 (1.5) |
54 (2.13) |
61 (2.4) |
52 (2.05) |
52 (2.05) |
50 (1.97) |
37 (1.46) |
50 (1.97) |
48 (1.89) |
557 (21.95) |
स्रोत: जागतिक हवामान संस्था |
शहर रचना
[संपादन]ब्रातिस्लाव्हा शहरामध्ये अनेक जुने मनोरे, तसेच आधुनिक इमारती आहेत.
|
अर्थव्यवस्था
[संपादन]ब्रातिस्लाव्हा प्रदेश स्लोव्हाकियामधील सर्वात श्रीमंत व समृद्ध प्रदेश असून येथील अर्थव्यवस्था देशातील २६ टक्के जीडीपीसाठी कारणीभुत आहे.[४] २००८ साली येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ४१,८०० € इतके होते जे युरोपियन संघातील सरासरीच्या १६७ टक्के व युरोपियन संघात नवव्या क्रमांकावर आहे.[५] येथील ७५ टक्के उद्योग आय.टी., बँकिंग, टेलिकॉम, पर्यटन इत्यादी सेवा क्षेत्रांत एकवटले असून पुष्कळशा सरकारी संस्थांची मुख्यालये देखील येथे आहेत. स्लोव्हाकिया देशात होणारी ६० टक्क्याहून अधिक विदेशी गुंतवणूक ब्रातिस्लाव्हा प्रदेशामध्ये होते.
जनसांख्यिकी
[संपादन]२०११ साली ४,५७,४५६ इतकी लोकसंख्या असलेल्या ब्रतिस्लाव्हा शहराच्या निर्मितीपासून १९व्या शतकापर्यंत येथे जर्मनांचे बहुमत राहिले होते.[६] पहिल्या महायुद्धानंतर येथील रहिवाशांपैकी ४० टक्के लोक हंगेरियन, ४२ टक्के जर्मन तर १५ टक्के स्लोव्हाक भाषिक होते. चेकोस्लोव्हाकियाचा भाग झाल्यानंतर येथील जर्मन व हंगेरियन लोकांची संख्या घटू लागली व १९३८ साली येथील ५९ टक्के लोक स्लोव्हाक व चेक भाषिक होते. दुसऱ्या महायुद्धानंतर येथील उर्वरित सर्व जर्मन व हंगेरियन लोकांना हाकलून लावले गेले व ब्रातिस्लाव्हाचा चेहरा पूर्णपणे स्लोव्हाक बनला. सध्या येथील ९० टक्के लोक स्लाव्हिक वंशाचे आहेत.
ऐतिहासिक लोकसंख्या
[संपादन]वाहतूक
[संपादन]युरोपाच्या मध्यभागात असल्यामुळे ब्रातिस्लाव्हा ऐतिहासिक काळापासून एक मोठे वाहतूक केंद्र राहिले आहे. अनेक महामार्ग व रेल्वेमार्ग ब्रातिस्लाव्हालामध्ये मिळतात. पूर्व-पश्चिम धावणारा डी-१ महामार्ग ब्रातिस्लाव्हाला स्लोव्हाकियातील कोशित्सा व इतर शहरांसोबत जोडतो तर उत्तर-दक्षिण डी-२ महामार्ग प्राग, ब्रनो व बुडापेस्ट शहरांना जोडतो.
ब्रातिस्लाव्हा शहरामधील नागरी वाहतूकीसाठी बस, ट्राम व ट्रॉलीबस वापरल्या जातात. नदीकाठावर असल्यामुळे येथे बोटींचा वापर देखील सुलभ आहे.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा ब्रातिस्लाव्हामधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. एस.के. स्लोव्हान ब्रातिस्लाव्हा, एफ.के. इंटर ब्रातिस्लाव्हा व एफ.सी. पेत्रझाल्का १८९८ हे येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहेत. तसेच आइस हॉकी, बास्केटबॉल, टेनिस इत्यादी खेळ देखील येथे लोकप्रिय आहेत. २०११ सालची आंतरराष्ट्रीय आइस हॉकी स्पर्धा येथेच खेळवली गेली.
शिक्षण
[संपादन]आंतरराष्ट्रीय संबंध
[संपादन]ब्रातिस्लाव्हाचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व व्यापारी संबंध आहेत.[७]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Dominic Swire (2006). "Bratislava Blast". Finance New Europe. 2006-12-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 8, 2007 रोजी पाहिले.
- ^ "Autoatlas – Slovenská republika" (6th ed.). Vojenský kartografický ústav a.s. 2006. ISBN 80-8042-378-4. 2009-07-22 रोजी पाहिले.
- ^ "Basic Information – Position". City of Bratislava. February 14, 2005. 2007-09-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. May 1, 2007 रोजी पाहिले.
- ^ "Bratislavsky Kraj (Bratislava Region) – Economy". Eurostat. 2004. 2006-04-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. April 25, 2007 रोजी पाहिले. Unknown parameter
|month=
ignored (सहाय्य) - ^ "Regional GDP per inhabitant in the EU27" (PDF). Eurostat. February 24, 2011. February 24, 2011 रोजी पाहिले.
- ^ Peter Salner (2001). "Ethnic polarisation in an ethnically homogeneous town" (PDF). Czech Sociological Review. 9 (2): 235–246. 2008-02-27 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2011-10-17 रोजी पाहिले.
- ^ "Bratislava City – Twin Towns". © 2003–2008 Bratislava-City.sk. 2008-10-26 रोजी पाहिले.
- ^ "Yerevan Municipality – Sister Cities". © 2005–2009 www.yerevan.am. 2011-10-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-06-22 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य) - ^ "Prague Partner Cities" (Czech भाषेत). © 2009 Magistrát hl. m. Prahy. 2009-07-02 रोजी पाहिले. External link in
|publisher=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - ^ "Twinning Cities". City of Thessaloniki. 2009-03-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-07 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- पर्यटन Archived 2010-07-22 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील ब्रातिस्लाव्हा पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |