Jump to content

उल्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उल्म म्युनस्टर

उल्म हे जर्मनीच्या बाडेन-व्युर्टेंबर्ग राज्यातील एक शहर आहे. हे शहर स्टुटगार्टपासुन साधारणपणे १०० किमी पूर्वेस डोनाउ नदीच्या काठी वसले आहे व येथील लोकसंख्या साधारणपणे १ लाख २० हजार इतकी आहे. इतिहासातील नोदिंप्रमाणे या शहराची स्थापना इ.स. ८५० मध्ये झाली. या शहराचा स्वता:चा प्रदीर्घ इतिहास असून अनेक ऐतिहासिक वास्तू या शहरात आहेत त्यातिल प्रसिद्ध म्हणजे या शहरातील भव्य चर्च जे उल्म म्युनस्टर या नावाने ओळखले जाते. १५ व्या शतकात बांधलेल्या ह्या चर्चची जगातील सर्वात उंच चर्च म्हणुन ख्याती आहे हे शहर अल्बर्ट आइनस्टाइन यांचे जन्मस्थान आहे. त्यांचे जन्मस्थळ हे शहरातील प्रमुख आकर्षण बनले आहे. आज या शहराची ओळख एक औद्योगिक शहर म्हणून होते तसेच अनेक संशोधन संस्थाकरता देखील या शहराची ख्याति आहे. उल्म हे जर्मन रेल्वेचे एक प्रमुख जंक्शन आहे.

उल्म शहर

अर्थव्यवस्था:

उल्ममधील कंपन्या यात अंतर्भूत आहेत:

  • डाईमलर आ.गे.
  • नोकिया नेटवर्क