Jump to content

बारवी नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बार्बी नदी या पानावरून पुनर्निर्देशित)
बारवी नदी
पाणलोट क्षेत्रामधील देश ठाणे जिल्हा, महाराष्ट्र

बारवी नदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी उल्हास नदीची एक उपनदी आहे. या नदीवर ठाणे शहर आणि त्याच्या महानगरांना पाणीपूरवठा करनारे बारवी धरण आहे. ह्या नदीला कारंज, मोऱ्याचापाडा येथे मुरबाडी नदी येऊन मिळते. पुढे जाऊन वसत गाव येथे उल्हास नदीला जाऊन मिळते. वसत गाव येथे या नद्यांच्या संगमावर औद्योगिक विभागाचा बंधारा आहे. तसेच या नद्यांच्या संगमावर प्रसिद्ध असे शिवमंदिर आहे.