प्रीती झिंटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(प्रिती झिंटा या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रीती झिंटा
जन्म ३१ जानेवारी, १९७५ (1975-01-31) (वय: ४३)
शिमला, हिमाचल प्रदेश, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट)
कारकीर्दीचा काळ १९९८ - चालू

प्रीती झिंटा (जन्म: ३१ जानेवारी १९७५) ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा जन्म जानेवारी ३१, १९७५ रोजी शिमला येथे झाला. तिने हिंदी भाषा शिवाय तेलुगु, पंजाबी आणि इंग्लिश भाषा चित्रपट सुद्धा अभिनय केला आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रातून पदवी मिळवल्यानंतर प्रीतीने १९९८ साली दिल से या हिंदी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दिल से तसेच त्याच वर्षी प्रदर्शित झालेल्या सोल्जर या चित्रपटांसाठी प्रीतीला सर्वोत्तम नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. तिच्या दिल चाहता है, कल हो ना हो आणि सलाम नमस्ते यासारख्या चित्रपटांमधील भूमिका विशेष गाजल्या आहेत.दोन्ही गालां वरच्या खोल खळ्या आणि मधाळ डोळे ही प्रीती झिंटा हीची जमेची बाजू मानली जात असे.

चित्रपटयादी[संपादन]

वर्ष शीर्षक भूमिका टिपा
१९९८ दिल से.. प्रीती  नायर फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार
सोल्जर प्रीती
१९९९ संघर्ष रीत ओबेरॉय
२००० क्या कहना प्रिया  बक्षी
हर दिल जो प्यार करेगा जानवी
मिशन काश्मीर सुफिया  परवेझ
२००१ फर्झ काजल  सिंग
चोरी चोरी चुपके चुपके मधुबाला
दिल चाहता है शालिनी
ये रास्ते हैं प्यार के साक्षी
२००२  दिल है तुम्हारा शालू
२००३ द लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय रेश्मा  (रुक्सर )
अरमान सोनिया  कपूर
कोई... मिल गया निशा
कल हो ना हो नैना  कॅथेरीने  कपूर फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार
२००४   लक्ष्य रोमिला  दत्ता
दिल ने जिसे अपना कहा डॉ परिणिता
वीर-झारा झारा  हायत  खान
२००५  खुल्लम खुल्ला प्यार करें प्रीती  दमाणी
सलाम नमस्ते सलाम नमस्ते
२००६ कभी अलविदा ना कहना अंबर  'अँबी ' मल्होत्रा
जान-ए-मन पिया  गोयल
२००७ झूम बराबर झूम अल्विरा  खान
ओम शांती ओम हरसेल्फ केवळ एका गाण्यामध्ये प्रदर्शन
२००८ हीरोज कुलजित  कौर
२०१३ इश्क इन पॅरिस इश्क
२०१४ हैप्पी  एंडिंग दिव्या
२०१६ भैय्याजी  सुपरहिट नीरज  पाठक 

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: