छाया महाजन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डॉ. छाया महाजन या एक मराठी लेखिका आहेत. त्या औरंगाबाद येथील डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयाच्या निवृत्त प्राचार्या आहेत.

महाजन यांनी मुन्शी प्रेमचंद, मोपाँसा, सॉल बेलो आदी लेखकांच्या पुस्तकांचे मराठी अनुवाद केले आहेत.

पुस्तके[संपादन]

 • An Inspirational Journey: Pratibha Devisingh Patil (सहलेखिका - रसिका चौबे)
 • एकादश कथा (कथासंग्रह)
 • ओढ (कथासंग्रह)
 • कॉलेज (कादंबरी)
 • गगन जीवन तेजोमय (ललित)
 • तन अंधारे (कादंबरी)
 • दशदिशा (ललित निबंध)
 • धुळीच्या चमकत्या पडद्याआड (ललित लेखसंग्रह)
 • नकळत (लघुकथासंग्रह)
 • पाण्यावरचे दिवे ((ललित लेखसंग्रह)
 • मानसी (कादंबरी)
 • मुलखावेगळा
 • मोरबांगडी (ललित लेखसंग्रह)
 • यशोदा
 • राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील
 • राहिलो उपकाराइतुका (कथासंग्रह)
 • वळणावर (कथासंग्रह)
 • स्पर्श (कथासंग्रह)
 • हरझॉग (मराठी अनुवाद, मूळ इंग्रजी लेखक - सॉल बेलो)
 • होरपळ (अनुभवकथन)

पुरस्कार आणि सन्मान[संपादन]

 • पुणे मराठी ग्रंथालयाचा राजेंद्र बनहट्टी कथा पुरस्कार.
 • ६वे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन जालना येथे १७/१८ जानेवारी २०१५ या काळात झाले; अध्यक्षस्थानी डॉ. छाया महाजन होत्या.
 • ’कॉलेज’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा वि.स. खांडेकर पुरस्कार (नोव्हेंबर २००७).
 • विनायकराव चारठाणकर फाउंडेशनचा पुरस्कार
 • महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून पुरस्कार