Jump to content

डेन्व्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेन्व्हर काउंटी या पानावरून पुनर्निर्देशित)
डेन्व्हर
Denver
अमेरिकामधील शहर


ध्वज
चिन्ह
डेन्व्हर is located in कॉलोराडो
डेन्व्हर
डेन्व्हर
डेन्व्हरचे कॉलोराडोमधील स्थान
डेन्व्हर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
डेन्व्हर
डेन्व्हर
डेन्व्हरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°44′21″N 104°59′5″W / 39.73917°N 104.98472°W / 39.73917; -104.98472

देश Flag of the United States अमेरिका
राज्य कॉलोराडो
स्थापना वर्ष नोव्हेंबर २२, इ.स. १८५८
क्षेत्रफळ ४०१.३ चौ. किमी (१५४.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ५,६८० फूट (१,७३० मी)
किमान ५,१३० फूट (१,५६० मी)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ६,००,१५८
  - घनता १,५११ /चौ. किमी (३,९१० /चौ. मैल)
  - महानगर २५,५२,१९५
प्रमाणवेळ यूटीसी−०७:००
denvergov.org


डेन्व्हर (इंग्लिश: Denver) ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. डेन्व्हर शहर रॉकी पर्वतरांगेच्या पायथ्याशी साउथ प्लॅट नदीच्या किनारी वसले आहे. डेन्व्हरची समुद्रसपाटीपासूनची उंची बरोबर १.६ किमी किंवा १ मैल असल्यामुळे डेन्व्हरला माइल हाय सिटी ह्या टोपणनावाने ओळखले जाते. २०१० साली ६ लाख लोकसंख्या असलेले डेन्व्हर अमेरिकेमधील २६व्या क्रमांकाचे मोठे शहर, तर २५.५ लाख वस्ती असलेले डेन्व्हर महानगर क्षेत्रांपैकी २१व्या क्रमांकाचे आहे.

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या शहरातील विमानतळ आहे.

राजकारण

[संपादन]

डेन्व्हरचे महापौर येथील मुख्याधिकारी असतात. या पदाची मुदत चार वर्षांची असते.

डेन्व्हर शहर आणि काउंटी हे एकाच प्रशासनाखाली असून ही काउंटी डेन्व्हर-ऑरोरा-लेकवूड महानगराचा भाग आहे.

वाहतूक

[संपादन]

महामार्ग

[संपादन]

इंटरस्टेट २५ आणि इंटरस्टेट ७० हे डेन्व्हर महानगरातून जाणारे प्रमुख महामार्ग आहेत. हे अनुक्रमाने उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिम धावतात. याशिवाय इतर इंटरस्टेट महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांचे जाळे डेन्व्हरभर पसरलेले आहे.

सार्वजनिक वाहतूक

[संपादन]

विमानतळ

[संपादन]

डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ (KDEN) येथील मुख्य विमानतळ आहे. हा शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३० किमी ईशान्य-पूर्वेस आहे. १३७ किमी इतक्या प्रदेशावर पसरलेला हा विमानतळ जगातील १८व्या तर अमेरिकेतील सहाव्या क्रमांकाचा सर्वाधिक वर्दळीचा विमानतळ आहे.[] विस्ताराच्या दृष्टीने हा अमेरिकेतील सगळ्यात मोठा विमानतळ आहे.[][] येथे युनायटेड एरलाइन्स आणि साउथवेस्ट एरलाइन्सचे मोठे वाहतूकतळ आहेत. येथे फ्रंटियर एरलाइन्सचे मुख्यालय आणि वाहतूकतळ आहे.

महानगराच्या दक्षिण भागातील सेंटेनियल विमानतळाचा (KAPA) वापर लांब पल्ल्याची खाजगी विमाने करतात तर रॉकी माउंटन मेट्रोपोलिटन विमानतळ (KBJC) आणि फ्रंट रेंज विमानतळांचा वापर छोटी खाजगी विमाने करतात.

बकली वायुसेना तळ हा अमेरिकेच्या वायुसेनेच्या वापरातील विमानतळ आहे.

स्टेपलटन विमानतळ आणि लाउरी वायुसेना तळ हे पूर्वीचे विमानतळ आता बंद असून दोन्ही ठिकाणी वस्ती करण्यात आलेली आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Passenger Traffic Reports". Denver International Airport. City & County of Denver Department of Aviation. December 4, 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "Which Airport Is The World's Biggest? And The Busiest?". flightmapping.com. December 28, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. February 24, 2012 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  3. ^ "How New York Works". How Stuff Works. September 26, 2007 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत