कनेक्टिकट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कनेटिकट
Connecticut
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द कॉन्स्टिट्युशन स्टेट (The Constitution State)
ब्रीदवाक्य: Qui transtulit sustinet (लॅटिन)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी हार्टफर्ड
मोठे शहर ब्रिजपोर्ट
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४८वा क्रमांक
 - एकूण १४,३५७ किमी² 
  - रुंदी ११३ किमी 
  - लांबी १७७ किमी 
 - % पाणी १२.६
लोकसंख्या  अमेरिकेत २९वा क्रमांक
 - एकूण ३५,७४,०९७ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता २७१/किमी² (अमेरिकेत ४वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  $६८,५९५
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ९ जानेवारी १७८८ (५वा क्रमांक)
संक्षेप   US-CT
संकेतस्थळ www.ct.gov

कनेटिकट(अमेरिकन उच्चार) किंवा कनेक्टिकट(मराठी उच्चार) (इंग्लिश: Connecticut; En-us-Connecticut.ogg उच्चार ) हे अमेरिका देशामधील आकाराने तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेले कनेक्टिकट लोकसंख्येच्या दृष्टीने देशातील २९व्या क्रमांकाचे व चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या घनतेचे राज्य आहे.

कनेटिकटच्या दक्षिणेला अटलांटिक महासागर, पश्चिमेला न्यूयॉर्क, उत्तरेला मॅसेच्युसेट्स व पूर्वेला ऱ्होड आयलंड ही राज्ये आहेत. राज्याच्या दक्षिणेला खाडीपलीकडे न्यूयॉर्क शहराचे लॉंग आयलंड हे बेट आहे. हार्टफर्ड ही कनेक्टिकटची राजधानी तर ब्रिजपोर्ट हे सर्वात मोठे शहर आहे. कनेक्टिकचा राज्याचा दक्षिण व पश्चिमेकडील मोठा भाग न्यूयॉर्क महानगरामध्ये गणला जातो.

कनेक्टिकट हे अमेरिकेमधील एक प्रगत व श्रीमंत राज्य आहे. दरडोई उत्पन्न, कौटुंबिक उत्पन्न व मानवी विकास निर्देशांक ह्या बाबतीत कनेक्टिकटचा देशात प्रथम क्रमांक लागतो. परंतु येथील श्रीमंत व गरीब लोकांच्या मिळकतीत फार मोठी तफावत आहे. बँकिंग व इतर आर्थिक सेवा हा येथील सर्वात मोठा उद्योग आहे.

न्यू इंग्लंडमधील इतर राज्यांप्रमाणे येथे युरोपियन वंशाचे अनेक लोक स्थायिक झाले आहेत.

मोठी शहरे[संपादन]

इतर शहरे[संपादन]

गॅलरी[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: