ज्ञानपीठ पुरस्कारविजेते
ज्ञानपीठ पुरस्कार भारत सरकारतर्फे साहित्याच्या क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६१ मध्ये हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा झाली आणि सन १९६५ पासून तो दरवर्षी देण्यात येतो. प्रसिद्ध मल्याळम लेखक जी. शंकर कुरूप हे या पुरस्काराचे प्रथम मानकरी ठरले. सन २०१०साठी दिला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार हा ४६ वा होता.
भारतीय साहित्यविश्वातला 'ज्ञानपीठ पुरस्कार ' हा सर्वोच्च सन्मान समजला जातो. या पुरस्कारामुळे भारतातील विविध भाषांमध्ये आदान-प्रदानाची प्रक्रिया सुरू होते आणि थोर साहित्यिकांची प्रतिमा विशिष्टभाषक समूहापर्यंत मर्यादित न राहता अखिल भारतीय साहित्यविश्वात उजळून निघते; विविधतेतून एकता, एकसूत्रीपणा साधला जातो. भारतीय ज्ञानपीठाचे सगळ्यात मोठे काम म्हणजे त्याने, भारतीय भाषांच्या या वेगवेगळ्या नद्यांना एकत्र करून भारताच्या कला आणि संस्कृतीच्या महानदीला जोडले आहे. ज्ञानपीठ पुरस्कार २०१८पर्यंत ५४ वेळा देण्यात आला, पण पाचवेळा (१९६७, १९७३, १९९९, २००४ आणि २००९) विभागून देण्यात आल्याने ५९ साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला आहे.
यादी[संपादन]
ज्ञानपीठ विजेत्यांची माहिती देणारी पुस्तके[संपादन]
- वाग्देवीचे वरदवंत - ज्ञानपीठ लेखक (लेखिका - मंगला गोखले)