अमृता प्रीतम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.


अमृता प्रीतम
Amrita Pritam
ਅੰਮ੍ਰਿਤਾ ਪ੍ਰੀਤਮ
Amrita pritam.jpg
जन्म ३१ ऑगस्ट १९१९
गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान
मृत्यू ऑक्टोबर ३१, २००५
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
भाषा पंजाबी, हिंदी
साहित्य प्रकार कविता, कादंबरी
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२)
साहित्य अकादमी पुरस्कार (१९५७)
पद्मविभूषण पुरस्कार

पंजाबी आणि हिंदी भाषांमधील प्रसिद्ध कवयित्री श्रीमती अमृता प्रीतम (१९१९-२००५) या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात.

अमृता प्रीतम यांचा जन्म १९१९मध्ये भारतातल्या पंजाब राज्यातील गुजरानवाला येथे झाला. त्यांचे बालपण लाहोरमध्ये गेले. शिक्षणदेखील तेथेच झाले. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे.

अमृता प्रीतम यांना १९५७ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार, १९५८ मध्ये पंजाब सरकारच्या भाषा विभागाचा पुरस्कार, १९८८ मध्ये बल्गेरियामधील वैरोव पुरस्कार आणि १९८२ मध्ये भारतातील सर्वोच्च साहित्यिक पुरस्कार समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अमृता प्रीतम यांचे इ.स.१९४८ मधील छायाचित्र

प्रमुख साहित्य[संपादन]

 • कवितासंग्रह :
  • कस्तुरी
  • कागज ते कॅनवस (ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कवितासंग्रह) इत्यादी १८ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
  • चुनी हुई कविताएँ
  • मैं जमा तूं (१९७७)
  • लामियाँ वतन
  • लोक पीड (१९४४)
  • सुनहुडे (साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवितासंग्रह)
 • ललित गद्‍य :
  • अग दियाँ लकीराँ (१९६९)
  • अज्ज दे काफीर (१९८२)
  • अपने-अपने चार वरे (१९७८)
  • इक उदास किताब (१९७६)
  • इक हथ मेहन्दी इक हथ छल्ला (१९८०)
  • इकी पत्तियाँ दा गुलाब
  • औरतः इक दृष्टिकोण (१९७५)
  • कच्चे अखर (१९७९)
  • कडी धुप्प दा सफर (१९८२)
  • काला गुलाब
  • किरमिची लकीरें
  • केडी जिंदगी केडा साहित्य (१९७९)
  • मुहब्बतनामा (१९८०)
  • मेरे काल मुकट समकाली (१९८०)
  • शौक सुरेही (१९८१)
  • सफरनामा (१९७३)

बाह्य दुवे[संपादन]