अमिताभ घोष (बँकर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अमिताव घोष या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Disambig-dark.svg

अमिताभ घोष (बँकर) हे भारतीय रिझर्व बँकेचे १६ वे गव्हर्नर होते. गव्हर्नर म्हणून त्यांचा कार्यकाळ अवघ्या २० दिवसांचा होता. सगळ्यात कमी कालावधीचे गव्हर्नर म्हणून अमिताभ घोष (बँकर) ओळखले जातात. अमिताभ घोष (बँकर) हे आधी रिझर्व बँकेचे डेप्युटी गव्हर्नर होते. तर त्या आधी त्यांनी अलाहबाद बँकेचे चेअरमन म्हणून काम पाहिले आहे आणि ते आय.डी.बी.आय. बँकेच्या संचालकांपैकी एक होते. तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजेमेन्ट या संस्थेच्या मंडळावरही होते.

अमिताभ घोष (बँकर) यांना रु. २/- (दोन सिरिज), रु. ५/- आणि रु. १०/- या नोटांवर भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून आपली सही करता आली. ए. घोष अशी छोटी स्वाक्षरी असलेल्या अमिताभ घोष (बँकर) यांच्या नोटा छंद म्हणून जमा कराणाऱ्यांमध्ये अत्यंत दुर्मिळ मानल्या जातात.

मागील:
डॉ. मनमोहनसिंग
रिझर्व बँकेचे गव्हर्नर
जानेवारी १५, १९८५फेब्रुवारी ४, १९८५
पुढील:
रा. ना. मल्होत्रा

हेसुद्धा पहा[संपादन]

भारतीय रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांची यादी

बाह्य दुवे[संपादन]