उर्वशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

उर्वशी ही इंद्राच्या दरबारातील सर्वात सुंदर गणली जाणारी अप्सरा होती.

उर्वशी व पुरूरवा यांचे राजा रविवर्मा यांनी काढलेले तैलचित्र.

जन्म[संपादन]

हिंदू पौराणिक कथांनुसार नरनारायण हे हिमालयात उग्र तपश्चर्येला बसले होते. त्यांच्या तपश्चर्येने आपले इंद्रपद डळमळते आहे अशी भीती वाटल्याने इंद्राने आपल्या दरबारातील अप्सरांना त्यांचा तपोभंग करण्यासाठी पाठवले. इंद्राचा कावा लक्षात आल्याने संतापलेल्या या ऋषींनी आपल्या मांडीवर थाप मारली व त्यातून इंद्राच्या दरबारातील इतर अप्सरांपेक्षा अतीव सुंदर असणार्‍या उर्वशीचा जन्म झाला. (संस्कृतात 'उरू' म्हणजे मांडी.) तिचे स्वर्गीय सौंदर्य पाहून इंद्राने पाठवलेल्या अप्सरांचे गर्वहरण झाले आणि त्या लाजेने चूर झाल्या. स्वतः इंद्राने नर व नारायणांची क्षमा मागितली. या ऋषींनी राग विसरून उर्वशीला इंद्राच्या दरबारात पाठवले.