Jump to content

ताराशंकर बंदोपाध्याय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ताराशंकर बंधोपाध्याय या पानावरून पुनर्निर्देशित)
ताराशंकर बंदोपाध्याय
जन्म नाव ताराशंकर बंदोपाध्याय
जन्म २३ जुलै, इ.स. १८९८
लाभपूर, जि. बीरभूम, पश्चिम बंगाल
मृत्यू १४ सप्टेंबर, इ.स. १९७१
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
भाषा बंगाली

ताराशंकर बंदोपाध्याय (बंगाली তারাশঙ্কর বন্দ্যোপাধ্যায়) (२३ जुलै, इ.स. १८९८; लाभपूर, जि. बीरभूम, पश्चिम बंगाल - १४ सप्टेंबर, इ.स. १९७१) हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते बांग्लाभाषी लेखक होते.

बालपण

[संपादन]

ताराशंकर बंदोपाध्याय यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १८९८ रोजी बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर या छोट्या गावी झाला. तराशंकर आठ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे पालनपोषण त्यांच्या मातोश्री प्रभावतीदेवी आणि त्यांच्या एका आत्याने केले. त्यांचे हायस्कूलपर्यंतचे शिक्षण गावात व पुढील शिक्षण कोलकत्याला झाले.

जीवन

[संपादन]

शिक्षण घेत असतानाच पहिले महायुद्ध सुरू झाले होते. बंगालमधील राजकीय वातावरण त्यामुळे तापलेले होते. या राजकीय विचारांचा प्रभाव ताराशंकर यांच्यावरही पडला आणि त्यांच्या या विचारांमुळे त्यांना त्यांच्या राहत्या घरातच नजरकैदेत ठेवले गेले. महायुद्ध संपल्यावर त्यांनी परत शिकण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आले नाही.

लेखन

[संपादन]

"दीनारदान" ही ताराशंकर बंदोपाध्याय यांची पहिली कादंबरी. ही कादंबरी शिशिर साप्ताहिकातून क्रमश: प्रकाशित झाली.