के. शिवराम कारंत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
के. शिवराम कारंत
ಶಿವರಾಮ ಕಾರಂತ.jpg
के. शिवराम कारंत
जन्म नाव के. शिवराम कारंत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय

शिवराम कारंथ (जन्म : १० ऑक्टोबर १९०२; - ९ डिसेंबर १९९७) हे ज्ञानपीठ पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कन्नड भाषेतील साहित्यकार होते. कर्नाटकातील यक्षगान या लोककलेचे पुनरुज्जीवन कारंतांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ४७ कादंबऱ्या हे केवळ आधुनिक कन्नड साहित्यासच दिलेले योगदानच नाही, तर भारतीय साहित्यविश्वास दिलेली समृद्धी आहे.

कारंतांच्या मराठीत अनुवादित झालेल्या कादंबऱ्या[संपादन]

  • अशी धरतीची माया (मूळ - मरळि मण्णिगे, इ.स. १९४१) - अनुवाद : रं.शा. लोकापूर (इ.स. १९८०)
  • कुडिय (मूळ - कुडियर कूसु, इ.स. १९५१) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९९१)
  • चोमा महार (मूळ - चोमन दुडी, इ.स. १९३१) - अनुवाद : श्यामलता काकडे (इ.स. १९८५)
  • डोंगराएवढा (मूळ - बेट्टद जीव, इ.स. १९८०) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९८५)
  • तनमनाच्या भोवऱ्यात (मूळ - मई मनगळ सुळियल्ली, इ.स. १९७०) - अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी (इ.स. १९८०)
  • धर्मराजाचा वारसा (मूळ - धर्मनारायण संसार) - अनुवाद : मीना शिराली (इ.स. १९९७)
  • मिटल्यानंतर (मूळ - अलिदा मेले, इ.स. १९६०) - अनुवाद : केशव महागावकर (इ.स. १९७५)
  • मूकज्जी (मूळ - मूकज्जिय कनसुगळू, इ.स. १९६८) - अनुवाद : सौ. मीना वांगीकर (इ.स. १९८०)

कारंतांवर लिहिलेली मराठी पुस्तके[संपादन]

  • कादंबरीकार कारंत (डॉ. सुधाकर शं देशपांडे) : कन्नड भाषेत लेखन करणाऱ्या कारंताच्या आठ कादंबऱ्यांचे अनुवाद मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाले, आणि पाठोपाठ त्या मराठी अनुवादित कादंबऱ्यांवर मराठीचे ख्यातनाम अभ्यासक डाॅ. सुधाकर देशपांडे यांनी समीक्षाही लिहिल्या.

त्या समीक्षा - लेखांबरोबर कारंतांच्या इतर कादंबऱ्यांचा थोडक्यात आढावा घेत 'कादंबरीकार कारंत' हे पुस्तक सिद्ध झाले आहे. 'अनुवादित साहित्यावरील समीक्षा ' ही बहुधा पहिल्यांदाच होत आहे.