चिनावल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गाव दरवाजा, चिनावल
  ?चिनावल
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
१.०५ चौ. किमी
• २४६ मी
जिल्हा जळगाव
तालुका/के रावेर
लोकसंख्या
घनता
लिंग गुणोत्तर
११,७४७ (२०११)
• ११,०००/किमी
९०१ /

चिनावल हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामधले एक गाव आहे. सुमारे बारा हजार घनदाट लोकसंखेचे चिनावल गाव समुद्रसपाटीपासून २४६ मीटर उंचीवर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी अंदाजे एक चौरस किलोमीटर (फक्त) सपाट भूक्षेत्रात वसलेले आहे. गारबर्डी धरणाच्या व विहिरीॅंच्या मुबलक पाण्यावर चिनावल गावचे शेतकरी काळ्याशार मातीच्या सुपीक शेतीत कपाशी, ज्वारी, मका, हरभरा सारखी पिके घेतात; पण चिनावल गाव जास्त करून केळीच्या उत्पादनासाठी ओळखले जाते.

चिनावल गावात बालवाडीपासून ते बारावीपर्यॅंतच्या शिक्षणाकरता मराठी, उर्दूइंग्रजी माध्यामांतून शिकवण्यार्‍या विविध शाळा आहेत; शिवाय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व बाहेरगावच्या विद्यार्थ्यासाठी राहण्याकरता वसतीगृहसुद्धा आहे. चिनावल गावचे ८४.२५ टक्के लोक साक्षर आहेत. ही टक्केवारी राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. लिंग गुणोत्तर ९०१ आहे, ते राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. गावकर्‍यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता गावात सरकारी जिल्हा रुग्णालय व काही खाजगी दवाखाने आहेत. गंभीर आजाराच्या उपचाराकरता गावकरी शेजारच्या सावदा किंवा जळगाव येथील मोठ्या रुग्णालयात जातात. महाराष्ट्र सरकारने गरीब लोकांसाठी २०१३ साली ९७५ प्रकारच्या आजारां व शस्त्रक्रियांकरता मोफत 'राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना' सुरू केली. त्याचा लाभ घेण्याकरता गावकरी जळगाव येथील सरकारमान्य रुग्णालयात जातात.

खानदेशमधे वसलेल्या चिनावल गावाच्या गावकर्‍याची मातृबोली, मराठी भाषेची उपभाषा असलेली खानदेशी बोली आहे., परंपरागत महाराष्ट्रीय आहाराव्यतिरिक्त चिनावलचे गावकरी वांग्याचे भरीत, उळदाची दाळ व शेवभाजी पसंत करतात. बदलत्या जगाशी संवाद साधुन चिनावलच्या गावकर्याचे पोषाख व राहणीमान बदलत आहे. आता चिनावल गावचे पुरुष गावकरी धोतर-बांडीस-कुर्ता-टोपी ऐवजी सदरा-पॅंट, टी शर्ट-जीन्स पॅंटला प्राधान्य देतात व स्त्रिया नऊवारी साडीऐवजी सहावारी साडी किॅंवा पंजाबी ड्रेस पसंद करतात. झोपड्या व कच्च्या मातीच्या घरांची जागा आता सिमेंट-कॉंक्रीटच्या पक्क्या घरांनी घेतली आहे. रात्री गावकरी आता प्रकाशाकरता कंदील-चिमणी ऐवजी विजेवर चालणारे बल्ब व ट्यूलाइटस वापरतात. करमणुकीकरता परंपरागत तमाशा बंद होऊन गावकरी त्याऐवजी आता टेलिव्हिजन वरती हिंदी चलचित्र पहाणे पसंद करतात. विद्यार्थ्यॉंमधे क्रिकेट खेळ लोकप्रिय आहे. सणांमधे गावकरी दिवाळी, दसरा, ईद-उल-फित्र, गणेश उत्सव, नवरात्री इत्यादी सण उत्साहाने साजरे करतात.

दळणवळणाकरता चिनावल गाव आजुबाजूच्या ८ गावांशी ८ रस्त्यांनी जोडले आहे. गावकरी येण्या-जाण्याकरता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचा व खाजगी वाहनाचा किंवा रिक्शाचा उपयोग करतात. बाहेरच्या जगाशी संपर्काकरता गावकरी आधुनिक भ्रमणध्वनी, इंटरनेट व क्वचितच टपालाचा वापर करतात.

चिनावलच्या आसपासची सर्व जागा शेतीने व्यापली गेली आहे. त्याचा हजारो वर्षापासून चालत आलेल्या वन्यजीवनावर परिणाम होऊन एकेकाळी आढळरणारे वाघ, लांडगा, अस्वल, कोल्हा सारखे हिंस्त्र वन्यपशू आता आढळत नाही. त्यांची जागा आता गाय, बैल, म्हैस, हेला, कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांनी घेतली आहे. पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे पण अजूनही आकाशात चिमण्या, कबुतर, कोकीळ, पोपट, कावळा, बदक, बगळा इत्यादी पक्षी दिसून येतात. गावामधे व गावाच्या सभोवती जास्त करुन निंबाची झाडे दिसतात, क्वचितच बाभूळ, साग, चिंच, आंबा इत्यादी झाडे आढळतात.

रामायणमहाभारत काळात चिनावल व खानदेशचा परिसर 'ऋषिका' नावाने ओळखला जायचा. इतिहासात चिनावल व खानदेश परिसरावर सातवाहन राजांपासून ते इंदूरच्या होळकर कुळाच्या राजांनी राज्य केले. ब्रिटिश काळात चिनावलच्या गावकर्‍यांनी बंद पाळून व प्रभात फेर्‍या काढून इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धात आपले योगदान दिले.

चिनावल गावात केळीच्या शेतात केळीच्या घडांचा ट्रक भरतांना चिनावलचे शेतकरी व मजूर

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

.