कावळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कावळा इंग्रजी नाव- Indian House Crow. आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नाव- Corvus splendenssplendens.
House Crow.jpg
प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: पृष्ठवंशी
जात: Aves
वर्ग: Passeriformes
कुळ: काकाद्य (Corvidae)
जातकुळी: Corvus
जीव: C. splendens
Corvus splendens map.jpg

कावळा हा सहज आढळणारा एक पक्षी आहे.

वर्णन[संपादन]

कावळा हा रंगाने काळा असतो. कावळा माणसाच्या वसाहतीजवळ राहणारा पण घरात न येणारा, परिचित पक्षी आहे. हा पक्षी चलाख, सावध, चपळ खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला, मृतभक्षी आहे.

गृह कावळा हा सुमारे १७ इं. (४२ सें. मी.) आकाराचा,मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरीत काळ्या रंगाचा एक पक्षी आहे. नर-मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात. तसेच याला हुशार पक्षी म्हणून ओळखतात.कावळ्याला दोन डोळे असतात.

== आवाज ==kaukau Crow.ogg माकडांना हुसकावून लावतांना कावळ्यांचा कलकलाट

वास्तव्य/आढळस्थान[संपादन]

कावळा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, मालदीव वगैरे देशांमध्ये सपाट भूप्रदेश ते डोंगराळ भागात सर्वत्र आढळतो.

गृह कावळ्याच्या आकार आणि मानेजवळील राखाडी रंगाच्या छटांवरून यांच्या किमान ४ उपजाती आहेत.

खाद्य[संपादन]

शिजलेले अन्न (भाजी, भात इ.), धान्य, उंदीर, लहान पक्षी, त्यांची अंडी, मृत जनावरे असे सर्व प्रकारचे खाद्य हे पक्षी खातात.

प्रजनन काळ[संपादन]

साधारणपणे एप्रिल ते जून हा काळ कावळ्यांचा वीणीचा काळ आहे. हे पक्षी जमिनीपासून किमान ३ मी. उंचीवर खोलगट, काटक्यांचे आणि मिळेल ते साहित्य वापरून घरटे तयार करतात. मादी एकावेळी ४ ते ५ फिकट निळी-हिरवी त्यावर तुटक तपकिरी रेषा असलेली अंडी देते. नर-मादी पिलांचे संगोपन मिळून करतात. कित्येकदा कावळ्याच्या घरट्यात कोकिळा आपली अंडी सोडून निघून जाते. अशा पिलांची देखभाल कावळेच करतात.

इतर[संपादन]

हिंदू संस्कृतीत माणसाच्या मृत्यूपश्चात तेराव्या दिवशी व प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस कावळ्याला केळ्याच्या पानात जेवण देण्याची प्रथा आहे. तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून ठेवण्याची प्रथा आहे.यास काकबली असे म्हणतात. ज्ञानेश्वरीत कावळ्याचा उल्लेख आहे. पैं चंद्रोदया आरौते | जयांचे डोळे फुटती असते | ते काउळे केवी चंद्राते |ओळखती ||४.२४ || तसेच पैल तो गे काऊ कोकताहे ही ज्ञानेश्वरांची रचना प्रख्यात आहे. व्यकंटेश स्तोत्रात 'काकविष्ठेचे झाले पिंपळ ' असे म्हटले आहे. कारण पिंपळ, वड यांसारख्या झाडांची फळे कावळे खातात. त्यांच्या विष्ठेतून त्यांच्या बीया बाहेर पडतात आणि त्या रुजतात. 'कावळा म्हणे मी काळा , पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे' ही आठवणीतील कविता एके काळी शालेय क्रमिक पुस्तकात होती. कावळ्याच्या घरटे बांधाण्याच्या जागेवरुन वर्षात होणाय्रा पावसाचा अंदाज बंधाला जातो.

चित्रदालन[संपादन]

पहा : प्राण्यांचे आवाज

इंग्लिश विकिपीडियावरील कावळ्याबद्दलची माहिती

Crow in Marathi कावळा