मांजर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मांजर हा मार्जार जातीतील एक मांसाहारी भूचर सस्तन प्राणी आहे. जगातील विविध प्रदेशांत मांजर पाळीव प्राणी म्हणून ओळखले जाते. मांजराला वाघांची मावशी असे म्हणतात, आणि वाघांना शिकार करायला मांजराने शिकवले आहे [ संदर्भ हवा ].

मांजर हा पाळीव प्राणी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. मांजराचे अनेक प्रकार आहेत. मांजर हा प्राणी अनेक रंगामध्ये असतो. मांजराचे मुख्य भक्ष्य उंदीर, विविध पक्षी, इतर छोटे प्राणी व दूध आहे [१]. क्वचित मांजर गवत देखील खाताना आढळते, परंतु असे आचरण साधारणतः क्षुधापूर्तीसाठी नसते. मांजराकडे पालेभाज्या पचवण्याची क्षमता नसल्याने, जेव्हा मांजर गवत खाते, अशा वेळेस, वमन क्रियेद्वारे मांजराच्या पोटातून गवताबरोबर इतर अपायकारक पदार्थ बाहेर पडतात [२].


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
भारतीय मांजराचे पिल्लू
  1. ^ "Cats Food". http://www.pet-happy.com. 30 मे 2018 रोजी पाहिले. 
  2. ^ "Cats Eating Grass". https://www.petmd.com. 30 मे 2018 रोजी पाहिले.