कुत्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कुत्रा
जुने प्लेस्टोसेन - अलीकडील
Coat types 3.jpg
प्रजातींची उपलब्धता
पाळीव
शास्त्रीय वर्गीकरण
Domain: युकारियोटा
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: कॅनिडे
जातकुळी: कॅनिस
जीव: कॅ. लुपस
उपजीव: कॅ. लु. फॅमिलियरीज

कुत्रा हा श्वान जातीतील एक भूचर सस्तन प्राणी आहे.

याचे शास्त्रीय नाव कॅनिस लुपस फॅमिलियारिस असे आहे.

कुत्रा हा इमानदार प्राणी असल्याने त्याचा वापर राखण करण्यासाठी, शिकार करण्यासाठी, गुन्ह्यांच्या तपासाठी तसेच सोबतीसाठी करतात. अनेक व्याधींमध्ये कुत्र्याचा उपयोग ‘थेरपी डॉग’ म्हणून केला जातो. कारण कुत्रा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतो. रक्तदाबाचा त्रास, हृदयरोग आदींनी ग्रस्त मंडळींना कसं हाताळायचं, याकरिता आता अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत. अशा प्रशिक्षित कुत्र्यांना ‘थेरपी डॉग्ज’ म्हणतात.

रंग, उंची, ठेवण व त्यांचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या जवळजवळ ४०० जाती पहावयास मिळतात या विविध जातीच्या कुत्र्यांचे वजन ६०० ग्रॅम पासुन अगदी १०० किलोपर्यंतही असते, तर उंची ८ इंचांपासून ४ फुटांपर्यंत असते.

उत्पत्ती[संपादन]

Indian spitz.jpg

कुत्र्याची उत्पत्ती ही बहुधा लांडग्यापासून झाली असावी, असे मानण्यात येते. लांडग्याचे आकारमान आणि दातांची ठेवण ही कुत्राशी मिळती-जुळती आहे.

इतिहास[संपादन]

कुत्रा हा पुरातनकाळापासून मनुष्याच्या सानिध्यात राहिला. अन्नासाठी कुत्रा हा माणसाच्या सानिध्यात राहिला असावा.

वैदिक वाङमयात कुत्र्याचे उल्लेख आढळतात. महाभारतातील राजा युधिष्ठीर हा स्वर्गात जाताना त्याच्याबरोबर एक कुत्रा होता. यावरून कुत्र्याचा इमानीपणा सांगितला आहे. इंद्राची सरमा नावाची कुत्री प्रख्यात होती. वेदकाळात कुत्रा हा काही कारणाने अपवित्र मनाला गेला. पण श्री दत्तगुरूंच्या सानिध्यात कुत्र्याला स्थान देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुत्र्याची समाधी आहे.


पहा : प्राण्यांचे आवाज