होळकर घराणे
Appearance
|
||||
| इंदूर येथील होळकरांचा राजवाडा |
||||
| राजधानी | इंदूर, महेश्वर | |||
| शासनप्रकार | संस्थान | |||
| राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: मल्हारराव होळकर अंतिम राजा: यशवंतराव होळकर |
|||
| अधिकृत भाषा | मराठी | |||
होळकर घराणे हे भारतातील, इंदूर संस्थानचे संस्थानिक होते. संस्थानिक बनण्याअगोदर १८ व्या शतकाच्या सुरुवातीला होळकर घराण्याचा कर्ता श्रीमंत सुभेदार महाराज मल्हार राव होळकर यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठा सेनेमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले व उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा उचलला. उत्तर भारतातील माळवा प्रांतातील व्यवस्था चोख रहावी, यासाठी पेशव्यांनी होळकरांना खास अधिकार दिले व इंदूर येथे आपले बस्तान बसवण्यास प्रोत्साहित केले. होळकर हे मूळचे महाराष्ट्रातील क्षत्रिय धनगर_कुरुबा समाजाचे होते.
घराण्यातील नावाजलेले व्यक्ती
[संपादन]- श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर महाराज
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
- श्रीमंत खंडेराव होळकर
- श्रीमंत सुभेदार तुकोजी राजे होळकर
- चक्रवर्ती सम्राट राजराजेश्वर महाराजा यशवंतराव होळकर.

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत