कोकीळ
![]() नर कोकीळ | |
![]() कोकिळेची अंडी | |
शास्त्रीय नाव | Eudynamys scolopacea scolopacea (Linnaeus) |
---|---|
कुळ | कोकिलाद्य (Cuculidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Asian Koel |
संस्कृत | पिक, कोकिल |
हिंदी | कोयल |
उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो. हा आवाज. हिवाळ्याची सुरुवात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो.हा नरपक्ष्याचा आवाज असतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हा पक्षी आपले एकुलते एक अंडे कावळ्याच्या किंवा डोमकावळ्याच्या घरट्यांत घालतात.
वर्णन[संपादन]
साधारणपणे कावळ्याएवढा (१७ इंच) आकारमानाचा हा पक्षी असून शेपटी लांब असते. नराचा मुख्य रंग काळा, डोळे गडद लाल रंगाचे चोच फिकट पोपटी रंगाची असून मादीचा मुख्य रंग गडद तपकिरी व त्यावर पांढरे-बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहेत
आढळ[संपादन]
कोकीळ पक्षी संपूर्ण भारतभर सर्वत्र आढळतो तसेच बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका येथेही याचे वास्तव्य आहे. कोकीळ भारतात निवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे.
वसतिस्थान[संपादन]
कोकीळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात, बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.
खाद्य[संपादन]
कीटक, फुलपाखरे, सुरवंट, फळे, मध पक्ष्याची अंडी हे यांचे खाद्य आहे. म्हणजेच हे पक्षी मांसाहार व शाकाहारही पाळतात.
वीण काळ[संपादन]
मार्च ते ऑगस्ट हा काळ कोकीळ पक्ष्यांचा विणीचा काळ असून हे पक्षी आपले घरटे बांधत नाहीत, तसेच ते आपल्या पिलांची देखभालही करत नाहीत. मादी (कोकिळा) फिकट हिरव्या-राखाडी रंगाची त्यावर लालसर-तपकिरी ठिपके असलेले अंडे तिला दिसेल अशा कोणत्याही इतर पक्ष्याच्या घरट्यात सोडून जाते.
पिलांचे संगोपन[संपादन]
आपल्या घरट्यात सोडून दिलेली अंडी उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे त्या घरट्यात राहणारे माता-पिता करतात.त्यांची स्वतःची पिले अंड्यातून बाहेर येण्याआधी बहुधा कोकिळेची पिले बाहेर आलेली असतात. त्यांची वाढही इतर पक्ष्यांच्या पिलांच्या मानाने वेगाने होते.
चित्रदालन[संपादन]
पहा : प्राण्यांचे आवाजku ku
संदर्भ[संपादन]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |