Jump to content

गोरेवाडा तलाव (नागपूर)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गोरेवाडा तलाव

गोरेवाडा हा तलाव नागपूरच्या गोंड राजाचे शासनकाळात,सीता नावाच्या गोंड समाजाच्या महिलेने बांधला. पूर्वी या तलावाचे नाव 'सीतागोंडीन तलाव' असे होते. सध्या नागपूर शहराच्या सुमारे अर्ध्या भागात पाणीपुरवठा करणारा तलाव म्हणुन या तलावाची ख्याती आहे. सन १९८२ साली हा तलाव नागपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट करण्यात आला.नागपूरच्या वायव्य दिशेला असणाऱ्या, नागपूर काटोल रस्त्यावर गोरेवाडा गावाजवळ असल्यामुळे नंतर याचे नाव गोरेवाडा असे ठेवण्यात आले.यास २३५० फूट लांब व सुमारे ५२ फूट उंच मातीचा बांध घालण्यात आला.तेथे जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या गेले.पूर्वी या तलावाचे काम मेजर ओल्ढन या अभियंत्याने पूर्ण केले. त्याचे नावाची कोनशिला येथे अस्तित्वात आहे.[]

या योजनेचे काम १९०९ साली सुरू करण्यात येउन ते ऑक्टोबर १९११ साली पूर्ण झाले.या पाणीपुरवठ्यासाठी नागपूर नगरपालिकेने त्यापोटी वाहनकर लावला होता.[]

क्षमता

[संपादन]

सुमारे ६.५ दशलक्ष घनमीटर पाणी साठवेल एवढी या तलावाची साठवणुक क्षमता आहे.त्यापैकी ४ दशलक्ष घनमीटर पाणी वापरता येउ शकते.

बदलते रुप

[संपादन]

पेंच धरण येथुन मोठ्या कालव्याद्वारे पाणी आणुन या तलावात साठविल्या जाते.हा तलाव, नागपूरच्या पाणीपुरवठ्यात 'संतुलन तलाव'(बॅलसिंग टॅंक) म्हणुन सध्या वापरल्या जात आहे. पेंचचा पाणीपुरवठा काही कारणाने बंद झाल्यास, सलग ८ दिवस हा तलाव नागपूरास पाणी पुरवु शकतो.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "'गोरेवाडा स्कीम'(लोकमत,नागपूर हॅलो नागपूर पुरवणी,पान क्र. २)". 2016-03-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-11-07 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]