एडवर्ड हीथ
Appearance
एडवर्ड हीथ | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ १९ जून १९७० – ४ मार्च १९७४ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | हॅरल्ड विल्सन |
पुढील | हॅरल्ड विल्सन |
जन्म | ९ जुलै, १९१६ केंट, इंग्लंड |
मृत्यू | १७ जुलै, २००५ (वय ८९) सॉल्झब्री, विल्टशायर, स्कॉटलंड |
राजकीय पक्ष | हुजूर पक्ष |
सर एडवर्ड हीथ (इंग्लिश: Edward Richard George Heath) (जुलै ९, १९१६ - जुलै १७, २००५) हा १९७० ते १९७४ सालांदरम्यान युनायटेड किंग्डमाचा पंतप्रधान राहिलेला हुजूर पक्षीय राजकारणी होता. हीथ १९६५ ते १९७५ सालांदरम्यान हुजूर पक्षाचा पक्षनेता होता. हीथ पंतप्रधानपदी निवडले जाण्याची घटना हुजूर पक्षाच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक मानली जाते, कारण हॅरोल्ड मॅकमिलन, ऍलेक डग्ल्स-होम इत्यादी उमराव मंडळींच्या नेतृत्वाची परंपरा लोपून हीथ व मार्गारेट थॅचर यांच्यासारख्या केवळ गुणवत्तेच्या बळावर राजकारणात पुढे आलेल्या नेत्यांची सद्दी सुरू झाली.
बाह्य दुवे
[संपादन]- व्यक्तिचित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत