हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन
Appearance
(हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन या पानावरून पुनर्निर्देशित)
हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन | |
युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ ५ डिसेंबर १९०५ – ३ एप्रिल १९०८ | |
राजा | सातवा एडवर्ड |
---|---|
मागील | आर्थर बॅलफोर |
पुढील | एच.एच. आस्क्विथ |
जन्म | ७ सप्टेंबर १८३६ ग्लासगो स्कॉटलंड |
मृत्यू | २२ एप्रिल, १९०८ (वय ७१) लंडन, इंग्लंड |
राजकीय पक्ष | लिबरल |
सही |
हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन (इंग्लिश: Henry Campbell-Bannerman; ७ सप्टेंबर, इ.स. १८३६ - २२ एप्रिल, इ.स. १९०८) हा एक ब्रिटिश राजकारणी व १९०५ ते १९०८ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. तसेच आपल्या राजकीय कारकिर्दीत त्याने ब्रिटिश सरकारमध्ये अनेक पदे सांभाळली होती.
कॅम्पबेल-बॅनरमन आपल्या खुल्या वाणिज्य धोरणासाठी प्रसिद्ध होता. सुमारे अडीच वर्षे पंतप्रधानपद सांभाळल्यानंतर कॅम्पबेल-बॅनरमनने ढासळत्या तब्येतीमुळे हे पद सोडले. पदत्याग केल्यानंतर केवळ १९ दिवसांनी तो मृत्यू पावला.
बाह्य दुवे
[संपादन]- युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावरील हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन ह्याचे चरित्र (इंग्लिश मजकूर)
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत