अल्क धातू[१] (अन्य नामभेद: अल्कली धातू ; इंग्लिश: Alkali metal , अल्कली मेटल ;) हे आवर्त सारणीमधील एकसंयुजी, धनविद्युतभारी धातूंना उद्देशून योजले जाणारे समूहवाचक नाव आहे. यांच्या इलेक्ट्रॉन-रचनेत बाहेरील कक्षेत एकच इलेक्ट्रॉन असतो. त्यामुळे हे धातू अतिशय विक्रियाशील असतात. आवर्त सारणीमधील इतर मूलद्रव्यांप्रमाणे या गटातील मूलद्रव्येही एकमेकांसारखे गुणधर्म दाखवतात.
या गटातील धातू खालीलप्रमाणे व वाढत्या अणुभाराप्रमाणे त्यांच्या गुणधर्मांत होणारा बदल खालील तत्क्यात दाखवला आहे :
अल्कली धातू वाढत्या अणुक्रमांकाप्रमाणे गुणधर्मात बदल दाखवतात. उदाहरणार्थ, त्यांची विद्युतऋणता कमी होत जाते; विक्रियाशीलता वाढत जाते; विलयबिंदू व उकळणबिंदू वाढत जातो; घनता वाढत जाते. पोटॅशियम व फ्रांसियम हे धातू याला अपवाद आहेत; त्यांची घनता अनुक्रमे सोडियम व सीशियम यांपेक्षा कमी असते.