Jump to content

आयर्लंड क्रिकेट संघाचा अफगाणिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०२०-२१

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयर्लंड क्रिकेट संघ अफगाणिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीमध्ये, २०२०-२१
अफगाणिस्तान
आयर्लंड
तारीख २१ – २६ जानेवारी २०२१
संघनायक असघर अफगाण अँड्रु बल्बिर्नी
एकदिवसीय मालिका
निकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावा रहमानुल्लाह गुरबाझ (१८०) पॉल स्टर्लिंग (२८५)
सर्वाधिक बळी नवीन उल हक (८) अँड्रू मॅकब्राइन (६)
मालिकावीर पॉल स्टर्लिंग (आयर्लंड)

आयर्लंड क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी जानेवारी २०२१ मध्ये संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला. संयुक्त अरब अमिरातीसोबत एकदिवसीय मालिका खेळून झाल्यावर आयर्लंड ने अफगाणिस्तानविरुद्ध तीन वनडे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्येच खेळले. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. सर्व सामने शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर झाले.

सुरुवातीला अफगाणिस्तानच्या खेळाडूंना संयुक्त अरब अमिरातीचा व्हिसा मिळण्यास उशीर होत गेला. त्यामुळे ही मालिका ओमानमध्ये हलवायचा विचार अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने केला. परंतु ५ जानेवारी २०२१ रोजी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघ ठरल्याप्रमाणे व्हिसा वेळेवर मिळाल्याने संयुक्त अरब अमिरातीला पोहोचेल आणि मालिका अबु धाबीलाच होईल असे स्पष्ट केले. उड्डाणाला उशीर झाल्याने आणि कोरोनाव्हायरसच्या विलगीकरणाच्या नियमांमुळे मालिका १८ जानेवारी ऐवजी २१ जानेवारी २०२१ रोजी सुरू करण्याचे ठरले.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिकेत तिन्ही सामन्यांत विजय मिळवत अफगाणिस्तानने एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग याला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. त्याने या मालिकेत दोन शतकांसह तिन्ही सामन्यात मिळून २८५ धावा केल्या.

सराव सामने

[संपादन]

४५ षटकांचा सामना:अफगाणिस्तान XI वि आयर्लंड XI

[संपादन]
१६ जानेवारी २०२१
धावफलक
अफगाणिस्तान XI
२४६ (४४.१ षटके)
वि
आयर्लंड XI
२४१ (४४.४ षटके)
हॅरी टेक्टर ४२ (५३)
सय्यद शिर्झाद ३/२८ (७ षटके)
अफगाणिस्तान XI २३ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
  • नाणेफेक : आयर्लंड XI, क्षेत्ररक्षण.

२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
२१ जानेवारी २०२१
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२८७/९ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२७१/९ (५० षटके)
लॉर्कन टकर ८३ (९६)
नवीन उल हक ३/६८ (९ षटके)
अफगाणिस्तान १६ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: रहमानुल्लाह गुरबाझ (अफगाणिस्तान)


२रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
२४ जानेवारी २०२१
१०:००
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
२५९/९ (५० षटके)
वि
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान
२६०/३ (४५.२ षटके)
पॉल स्टर्लिंग १२८ (१३२)
नवीन उल हक ४/४२ (१० षटके)
रहमत शाह १०३* (१०९)
कुर्तीस कॅम्फर १/२८ (४ षटके)
अफगाणिस्तान ७ गडी राखून विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: रहमत शाह (अफगाणिस्तान)


३रा सामना

[संपादन]
विश्वचषक सुपर लीग
२६ जानेवारी २०२१
१०:००
धावफलक
अफगाणिस्तान Flag of अफगाणिस्तान
२६६/९ (५० षटके)
वि
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
२३० (४७.१ षटके)
रशीद खान ४८ (४०)
सिमी सिंग ३/३७ (१० षटके)
पॉल स्टर्लिंग ११८ (११९)
रशीद खान ४/२९ (९ षटके)
अफगाणिस्तान ३६ धावांनी विजयी.
शेख झायेद क्रिकेट स्टेडियम, अबु धाबी
सामनावीर: रशीद खान (अफगाणिस्तान)