Jump to content

वर्ग:अरविंद घोष यांचे साहित्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ketaki Modak (चर्चा | योगदान)द्वारा ११:०२, ३० नोव्हेंबर २०२१चे आवर्तन


श्रीअरविंदांचे पुढे ग्रंथरूपाने प्रकाशित झालेले बहुतांशी साहित्य – Synthesis of Yoga (योगसमन्वय), Essays on the Gita (गीतेवरील निबंध), Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य), Life Divine (दिव्य जीवन), The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया), The secret of the Veda (वेदरहस्य) The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) इ. सर्व साहित्य ‘आर्य’मध्ये क्रमश: प्रकाशित होत असे.

श्रीअरविंद यांचे राजकीय व सामाजिक विषयावरील लेखन

श्रीअरविंद यांचे शिक्षणविषयक लेखन

श्रीअरविंद यांचे अनुवादित साहित्य

श्रीअरविंद यांनी संस्कृत, बंगाली, तमिळ, ग्रीक, फ्रेंच आणि लॅटिन या भाषांमधील निवडक साहित्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद केलेला आहे. त्यांनी वेद आणि उपनिषदांमधील निवडक साहित्याचाही अनुवाद इंग्रजीत केला आहे. त्यांनी संस्कृतमधील निवडक साहित्याचे बंगालीमध्येही भाषांतर केले आहे. इ.स. १९८३ ते इ.स.१९४० या दरम्यान त्यांनी हे अनुवादाचे कार्य केले आहे.[]

श्रीअरविंदांच्या अनुवादित साहित्यामध्ये काव्यरचनांचादेखील समावेश आहे. उदा. त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या 'सागर संगीत' या बंगाली काव्याचा Songs of the Sea या काव्यामध्ये अनुवाद केला आहे.[]

श्रीअरविंद यांची काव्यरचना

श्रीअरविंद यांच्या The future poetry या पुस्तकात त्यांच्या बहुतांशी काव्यरचनांचे संकलन करण्यात आलेले आहे.

श्रीअरविंद यांनी साधकांना लिहिलेली पत्रे

श्रीअरविंद यांचे ग्रंथात्मक लेखन

श्रीअरविंद यांनी विपुल लेखन केले आहे. ते सारे लेखन Collected Works of Sri Aurobindo या नावाने ३६ खंडांमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. त्यातील काही महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे सेनापती बापट यांनी मराठीत भाषांतर केले आहे.

सेनापती बापट यांच्याशिवाय इतर अनुवादकांनी केलेली अन्य साहित्याची भाषांतरेही उपलब्ध आहेत. यामध्ये अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे, प्रज्ञा सुखटणकर, डॉ.केतकी मोडक यांचा समावेश आहे. त्यांनी केलेला अनुवाद संजीवन आणि अभीप्सा मासिक या दोन मराठी मासिकांमधून प्रकाशित होत असतो.

अनुवादक भा.द.लिमये, विमल भिडे यांनी अनुवादित केलेली काही पुस्तके -

  • योगाची मूलतत्त्वे - (ISBN 81-7058-168-0)
  • The Mother - माता

सावित्री (महाकाव्य)[edit]

श्रीअरविंद यांनी लिहिलेले सर्वांत प्रसिद्ध महाकाव्य म्हणजे [[सावित्री : एक आख्यायिका आणि एक प्रतीक]]. सुमारे २४ हजार ओळींचे हे खंडकाव्य म्हणजे दिव्य आध्यात्मिक चिंतन आहे. सुमारे ५० वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते. पुढे मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले. मराठीतील उपलब्ध प्रकाशित अनुवाद पुढीलप्रमाणे -

  • सावित्री (एक आख्यायिका आणि एक प्रतीक) - मराठी अनुवाद - सौ.शैलजादेवी वहिनीसाहेब प्रतिनिधि - (ISBN 81-7058-334-9) - हा काव्यानुवाद आहे.
  • श्रीअरविंद सावित्री - कवी नृसिंहाग्रज - मूळ सावित्रीतील ओळींबरहुकूम केलेला हा अनुवाद आहे.
  • संक्षिप्त सावित्री - लेखक श्री.माधव पंडित - अनुवाद - सुहास टिल्लू
  1. ^ Collected Works of Sri Aurobindo : Volume 05, Publisher's Note
  2. ^ Perspectives of Savitri - Part I by R.Y. Deshpande

"अरविंद घोष यांचे साहित्य" वर्गातील लेख

एकूण ३५ पैकी खालील ३५ पाने या वर्गात आहेत.