Jump to content

वंदे मातरम् (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वंदे मातरम् हा लेख-संग्रह श्रीअरविंद घोष यांच्या १२५ व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आला.

वंदे मातरम्
लेखक श्रीअरविंद घोष
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) Bande Mataram
अनुवादक डॉ.ग.मो.पाटील व सहकारी
भाषा मराठी
देश भारत
साहित्य प्रकार लेखसंग्रह
प्रकाशन संस्था महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ
प्रथमावृत्ती १६ ऑगस्ट १९९७
पृष्ठसंख्या १८५

संपादक मंडळ[संपादन]

डॉ.ग.मो.पाटील, डॉ.न.ब.पाटील, श्री.गो.ब.सरदेसाई, श्रीमती लता राजे, आणि डॉ.रवींद्र रामदास या संपादक मंडळाने श्री.मधुकर आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाचे काम पूर्ण केले. श्रीअरविंद यांच्या इंग्रजीतील निवडक लिखाणाचा अनुवाद या पुस्तकात करण्यात आला आहे. [१]

श्रीअरविंद घोष यांच्या लेखनाचे ३६ खंड प्रकाशित झाले आहेत.[२] त्यातील काही लेखांची निवड डॉ. रवींद्र रामदास यांनी केली आणि त्या लेखांचा अनुवाद संपादक मंडळाने केला. एकंदर ३७ लेख यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.पुस्तकाची मांडणी[संपादन]

क्र लेखाचे नाव अनुवादक नियतकालिक अन्य
०१ तेजस्वी प्रकाशाकडे ०१ डॉ.ग.मो.पाटील इंदुप्रकाश

०७ ऑगस्ट १८९३

राष्ट्रीय सभेच्या नेतृत्वासंबंधी
०२ तेजस्वी प्रकाशाकडे ०२ डॉ.ग.मो.पाटील इंदुप्रकाश

२८ ऑगस्ट १८९३

राष्ट्रीय सभेच्या राष्ट्रीयतेसंबंधी
०३ भवानी मंदिर डॉ.ग.मो.पाटील भवानी मंदिराची संकल्पना
०४ मृणालिनीस पत्र लता राजे ३० ऑगस्ट १९०५ पत्नीस बंगाली भाषेत लिहिलेले पत्र.
०५ सिंहावलोकन डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

१६ एप्रिल १९०७

०६ अतिरेकवाद नव्हे राष्ट्रवाद. डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

२६ एप्रिल १९०७

अभिनव भारत निर्माण करण्याची विधायक प्रेरणा
०७ भारत स्वतंत्र व्हावा काय?. १ डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

२७ एप्रिल १९०७

परकीय सत्ता प्रतिकार करण्यासाठीच
०८ भारत स्वतंत्र व्हावा काय?. २ डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

२९ एप्रिल १९०७

राष्ट्रीय स्वातंत्र्याविना राष्ट्रीय विकास अशक्य
०९ भारत स्वतंत्र व्हावा काय?. ३ डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

३० एप्रिल १९०७

निकोप राष्ट्रीय विकासासाठी परकीय शासनाचा प्रतिकार आवश्यक
१० भारत स्वतंत्र व्हावा काय?. ४ डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

०२ मे १९०७

परकीय शासन राष्ट्राच्या ऐक्याला विघातक कसे आहे?
११ देशभक्तीचा उगम . गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

१९ जून १९०७

आध्यात्मिक क्षेत्रातील निर्विवाद श्रेष्ठत्व - देशभक्तीचा मूळ स्रोत
१२ धर्म आणि राजकारण. गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

०२ ऑगस्ट १९०७

धर्म राजकारणापासून विभक्त म्हणणे हास्यास्पद
१३ राष्ट्रीयत्वाचीं मूलतत्त्वे गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

१७ ऑगस्ट १९०७

भारत एक राष्ट्र कसे?
१४ विद्यार्थांना संदेश गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

२३ ऑगस्ट १९०७

सर्व शक्ती मातृभूमीच्या सेवेसाठी
१५ चिवट जातीव्यवस्थेतील अपप्रवृत्ती... गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

२० सप्टेंबर १९०७

विषमता ही उच्च विचारसरणीस विसंगत
१६ वंदे मातरम् वरील खटला गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

२५ सप्टेंबर १९०७

ब्रिटीश शासनाने लावलेला खटला
१७ राजकारण व आध्यात्मिकता. गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

०९ नोव्हेंबर १९०७

राष्ट्रीय चळवळीचा प्राथमिक उद्देश
१८ राष्ट्रीय संघर्षाची वाटचाल. गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

१६ नोव्हेंबर १९०७

राष्ट्रवाद चिरंतन शक्तीचा हुंकार
१९ श्रीकृष्ण व अनियंत्रित राजसत्ता... गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

२५ नोव्हेंबर १९०७

श्रीकृष्णाचा आदर्श मानणारे राष्ट्र हुकुमशाही मानणार नाही
२० बहिष्काराची नैतिकता गो.ब.सरदेसाई जप्त करण्यात आलेला लेख बहिष्कार हे एक प्रकारचे युद्धच आहे.
२१ पुणे येथील भाषण. डॉ.न.ब.पाटील १३ जानेवारी १९०८ सुरत काँग्रेसनंतर पुण्यात आलेले असतानाचे भाषण - आत्मनिर्भर होण्याचा मंत्र
२२ नवा राष्ट्रवाद डॉ.ग.मो.पाटील नव्या राष्ट्रवादाचे स्वरूप
२३ सद्यःस्थिती डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

१९ जानेवारी १९०८

मुंबई येथील भाषण

राष्ट्रवाद हा ईश्वरदत्त धर्म आहे.
२४ खेडे आणि राष्ट्र. गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

०८ मार्च १९०८

खेडे हा राष्ट्राचा मूलाधार
२५ आजच्या काळाची गरज गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

१८ मार्च १९०८

निस्वार्थी आणि अध्यात्मवादी

कार्यकर्त्यांची गरज

२६ आध्यात्मिक राष्ट्रवाद गो.ब.सरदेसाई वंदेमातरम्

१८ मार्च १९०८

राष्ट्रीय चळवळीची अखेर आध्यात्मिक पूर्ततेत होणार
२७ आईची मागणी डॉ.ग.मो.पाटील वंदेमातरम्

११ एप्रिल १९०८

आत्मार्पण करण्याची मागणी केली आहे.
२८ धर्म म्हणजे एक जीवन प्रणाली. डॉ.न.ब.पाटील उत्तरपाडा येथील भाषण

३० मे १९०९

भारताचे अस्तित्व मानवतेच्या जोपासनेसाठी
२९ माझ्या देशबांधवांना अनावृत पत्र डॉ.न.ब.पाटील जुलै १९०९ संपूर्ण स्वायत्तता हे आमचे ध्येय आहे.
३० 'कर्मयोगिन'चा आदर्श डॉ.न.ब.पाटील - स्वतःला ओळखणे हे आमचे आद्य कर्तव्य
३१ भारत जागा होत आहे. डॉ.न.ब.पाटील - भारताच्या नवजागरणाची स्पंदने
३२ एक नवा मंत्र डॉ.न.ब.पाटील - राष्ट्रीय आत्मसमर्पण
३३ बाळ गंगाधर टिळक. लता राजे १९१८ बाळ गंगाधर टिळक: लेखन आणि व्याख्याने या ग्रंथास दिलेली प्रस्तावना
३४ उत्तुंग व्यक्तिमत्व आणि दुर्दम्य आकांक्षा लता राजे दि इंडिपेंडंट

०५ ऑगस्ट १९२०

लोकमान्य टिळक यांच्यावरील मृत्युलेख
३५ श्रीअरविंद यांचे डॉ. मुंजे यांस पत्र गो.ब.सरदेसाई डॉ.बा.शि.मुंजे यांना पत्र

३० ऑगस्ट १९२०

काग्रेसचे अध्यक्षपद का स्वीकारता येणार नाही ?
३६ गूढवादाचा सिद्धांत. डॉ.ग.मो.पाटील - वेद ही मानवतेच्या उच्च उन्नयनाची गाथा आहे.
३७ १५ ऑगस्ट १९४७ डॉ.न.ब.पाटील - भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिलेला संदेश
परिशिष्ट

बाह्य दुवा[संपादन]

येथे पुस्तक उपलब्ध

संदर्भ[संपादन]

  1. ^ डॉ.ग.मो.पाटील (१९९७). वंदे मातरम्. मुंबई: महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ.
  2. ^ The Complete Works of Sri Aurobindo, Published by Sri Aurobindo Ashram Publication Department, Pondicherry